Tuesday, April 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBreaking News : नाशिकचा हर्षवर्धन सदगीर डबल ‘महाराष्ट्र केसरी’

Breaking News : नाशिकचा हर्षवर्धन सदगीर डबल ‘महाराष्ट्र केसरी’

पुणे |

महाराष्ट्र केसरी 2026 चं विजेतेपद नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाड याला 4-2 अशा फरकाने पराभूत करत पटकावले. या विजयासह सदगीर सातवा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरला आहे.

- Advertisement -

पुण्यातील वाघोली येथे झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही मल्लांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या हाफमध्ये 1-1 अशी बरोबरी होती. दुसऱ्या हाफमध्ये गायकवाडला ‘अ‍ॅक्टिव्हिटी टास्क’मध्ये गुण मिळवता आला नाही, याचा फायदा घेत सदगीरने आघाडी घेतली. त्यानंतर सलग गुण मिळवत त्याने 4-1 अशी आघाडी मिळवली. शेवटच्या क्षणी गायकवाडला एक गुण मिळाला, मात्र अखेर सामना 4-2 असा सदगीरच्या बाजूने संपला.

या आधी माती विभागात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखचा 3-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. तर गादी विभागात हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलचा 10-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

अखेरच्या लढतीत दमदार कामगिरी करत हर्षवर्धन सदगीरने ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब जिंकत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : महापालिकेच्या नावे डिजिटल धमकी; बनावट मेसेजमुळे नाशिककरांना...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात सध्या उन्हाचा तडाखा वाढत असतानाच, सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) नाशिककरांना (Nashik) घाम फोडणारी नवी शक्कल लढवली आहे. नाशिक महानगरपालिकेचा...