Tuesday, May 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकचा सैनिक ठाकरेंचा की शिंदेंचा

नाशिकचा सैनिक ठाकरेंचा की शिंदेंचा

नाशिक । रवींद्र केडिया | Nashik

शिवसेना (shiv sena) आणि नाशिक शहर यांचे एक अतूट नातं आहे. राज्याच्या राजकारणात (politics) शिवसेनेने आपले पाय खंबीरपणे रोवताना प्रत्येक वेळी नाशिकनेच (nashik) साथ दिली आहे.

- Advertisement -

शिवसेनेची पहिली शाखा नाशिकमध्ये उघडली गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांनी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना विधानसभा निवडणूक (Shiv Sena Assembly Elections) लढवेल, असा निर्णय घेतला. 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण (politics) ही भूमिका घेत त्यांनी राजकारणाच्या मंचावर उडी घेतली.

त्यावेळी नाशिकमध्ये आई सप्तशृंगीला ‘दार उघड बये दार उघड’ ही हाक दिली होती. शिवसेनेचे सरकार स्थापन झालं ते नाशिकच्या सभेनंंतर. त्यामुळे शिवसेनेच्या (shiv sena) प्रत्येक वाटचालीत मैलाचा दगड ठरणारी भूमिका नाशिकने वाढवलेली आहे. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत मंडळीतून पक्षाचे दोन गट पडले आणि यात पुन्हा एकदा अंतर्गत मोठा फटका हा सामान्य शिवसैनिकांना (shivsainik) बसताना दिसून येत आहे.

प्रत्यक्षात तळागाळात काम करणारे शिवसैनिक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे दिसून येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांंनी उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव जाहीर केले. तेव्हापासून सैनिक हा उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभा राहिला.

दरम्यानच्या काळात काँग्रेस (congress), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) यांच्या सोबत अभद्र युती केली म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) चाळीस आमदार सोबत घेत पक्षप्रमुखांविरोधात बंड उभारले. त्यांनी भाजपसोबत (BJP) युती करत सरकार स्थापन केले. कालांतराने निवडणूक आयोगाने (Election Commission) त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निशाणी त्यांना दिली. त्यामुळे ते अधिकृत पक्ष म्हणून समोर आले.

आता प्रश्न आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संघटनेचा अस्तित्वाचा… या मोठ्या घडामोडीनंतर काय पक्ष उद्ध्वस्त होईल की टिकेल? असा सवाल सर्वच स्तरातून व्यक्त केला जात होता. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) सुनावणीदरम्यान गेल्या आठ दिवसांपासून या राजकीय पेच प्रसंगाचे विविध पैलू समोर येत आहेत. प्रत्यक्ष पक्ष कोणाचा, हे निकालानंतर स्पष्ट होणार असले तरी आज तळागाळातील सामान्य शिवसैनिक हा अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचे नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) नगरसेवकांचे 40 संख्याबळ होते. खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) शिवसेनेचे होते. त्याचवेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली नव्याने मान्यता मिळवलेल्या ‘शिवसेना’ पक्षामध्ये खा. हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे, आ. दादा भुसे, माजी उपमहापौर अजय बोरस्ते, तत्कालीन शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊलाल चौधरी, प्रवीण तिदमे, राजू अण्णा लवटे, हर्षदा गायकर यासह ज्येष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेतला.

नाशिकचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीला गती देण्यात आली. शहराच्या पदाधिकार्‍यांनी विशेष जागरूकता पाळत 40 पैकी 33 नगरसेवक एकसंघ ठेवण्यात यश मिळवले असले तरी वरिष्ठ पदाधिकार्‍यांंमध्येही समन्वय ठेवून त्यांनी पक्ष फुटण्यापासून वाचवण्याची कसोशीने प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

मात्र त्याचवेळी संजय राऊत यांच्या नाशिक दौर्‍याच्या प्रत्येक कार्यक्रमापूर्वी नियोजनपूर्वक मोठ्या संख्येने शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश सोहळा पार पाडला जात आहे. शिवसेना या पक्षाच्या नावावर व धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक आयोगाने दिलेला निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये विशेषत: इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे. पक्षांतर करावें की थांबावं? काय करावे? हे निश्चित ठरू शकत नसल्यामुळे विचाराच्या द्वंद्व युद्धात सुप्रिम कोर्टाच्या अंतिम निकालापर्यंत वाट पाहण्याचा सबुरीचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेने नुकतेच सुरू केलेल्या शिवगर्जना उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तळागाळातील शिवसैनिकांना पदाधिकार्‍यांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या पाच जणांच्या समितीच्या माध्यमातून समन्वय साधून एकजीव करण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसून येत आहे. निश्चित त्याला प्रतिसादही मिळत असला तरी त्याच वेळी खा. हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून खासदार स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याभरातील बचत गटांना एकत्र करत पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.

शिवसैनिक हा छत्रपती शिवरायांवर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांवर प्रेम करणारा सैनिक आहे. अनेक वेळा बंंडाळी झाली, पक्षांतर झाले, पक्ष फुटण्याची चिन्हे दिसून आली, मात्र पहिल्यांदा पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात दोन गट पडल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र व्यतीत झाल्याचे दिसून येत आहे. पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादात परस्परांविरुद्ध नव्हे तर पक्ष कार्यकर्ते अनौपचारिक गप्पांमध्ये भाजपबद्दल नाराजी व्यक्त करताना आढळतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या