Wednesday, October 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणात आज अंतिम निकाल; नराधम कांबळेला फाशी...

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणात आज अंतिम निकाल; नराधम कांबळेला फाशी की जन्मठेप?

पुणे | Pune
नसरापूर येथे १ मे रोजी ३ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (२५ जून) दोषी ठरवले आहे. आज (२९ जून) या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे शिक्षा सुनावणार आहे. या निकालात आरोपी भीमराव कांबळे याला फाशी होणार की जन्मठेप याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात निकाल लागणार आहे. अत्याचार महिन्यांत खटल्याची सुनावणी पूर्ण आणि खून खटल्यात सर्वात जलदगतीने निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरणार आहे.

वास्तविक या खटल्याचा निकाल २५ जून रोजी अपेक्षित होता. त्यावेळी बाजू मांडण्याची संधी साधून आरोपीनी पुन्हा ‘तो मी नव्हेच’ हेच सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोषी ठरवलेल्या भीमराव कांबळे याला आज शिक्षा सुनावणार असल्याचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी सांगितले. त्यामुळे आता आरोपीला फाशीची शिक्षा सुनावणार, जन्मठेप की आजन्म कारावासाची शिक्षा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

संपादकीय : २९ जून २०२६ – श्रद्धेच्या गाभार्‍यातील डाग अन् नैतिकतेचे मूकवध

पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करत विशेष पथक स्थापन केले आणि आरोपीला अटक केली. पोलिसांनी गुन्ह्याचा गतीने तपास करत एक हजार २०० पानी दोषारोपपत्र अवघ्या १५ दिवसात न्यायालयात दाखल केले. विशेष न्यायालयाने २१ मेपासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली होती. सरकारी पक्षाने मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषक यांच्यासह ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. शनिवारी (दि.२०) दोन्ही बाजूचे अंतिम युक्तिवाद पूर्ण करण्यात आले होते.

नेमक प्रकरण काय आहे?
१ मे २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमधून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर काही वेळाने तिचा मृतदेह सापडला. यातून अनेक संशयाचा वास आल्याने पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली तेव्हा चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सर्व सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे तसेच साक्षीदारांचे जबाब घेत आरोपी भीमराव कांबळे याला ताब्यात घेतले आणि अटक केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कमी कालावधीत तपास करून तब्बल १२०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी जलदगतीने करण्यात आली. सरकार पक्षाने पुरावे आणि साक्षीदारांच्या मदतीने बाजू भक्कम केली. बचाव पक्षानेही त्यांची बाजू मांडली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ना. राम शिंदे यांनी दुसर्‍यांदा घेतली ज्येष्ठ नेते यशवंतराव...

0
अहिल्यानगर/ सोनई |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला असून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख...