Monday, July 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIran New Supreme Leader : खामेनींच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अराफी अंतरिम 'सुप्रीम लीडर'

Iran New Supreme Leader : खामेनींच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अराफी अंतरिम ‘सुप्रीम लीडर’

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे ८६ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्यासह त्यांचा जावई आणि मुलीचा मृत्यू (Death) झाला. या हल्ल्यानंतर इराणने देखील दोन्ही देशांना चोख प्रत्युत्तर दिले असून, त्यांच्या प्रमुख लष्करी स्थळांना लक्ष केले आहे. खामेनी यांच्या निधनानंतर आता अनुभवी धर्मगुरू आणि खामेनी यांचे जवळचे सहकारी अयातुल्ला अलीरेजा अराफी यांना तात्पुरते इराणचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू; कुटुंबातील इतर सदस्यही ठार

अयातुल्ला अलीरेजा अराफी (Ayatollah Alireza Arafi) हे एक ज्येष्ठ धार्मिक व्यक्ती असून, ते इराणमधील सर्व मदरशांचे नेतृत्व करतात. तसेच गार्जियन कौन्सिल आणि असेंबली ऑफ एक्सपर्ट्सचे ते सदस्य आहेत. त्यांना देशाच्या सर्वोच्च पदी बसवल्याने एक धार्मिक नेताच पुन्हा सत्तेत आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना नेतृत्व परिषदेचे कायदेतज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले असून, तात्पुरते सर्वोच्च नेत्याची भूमिका पार पाडण्याचे काम देण्यात आल्याचे वृत्त इराणी स्टुडंट्स न्यूज एजन्सी (ISNA) ने दिले आहे.

कोण आहेत अयातुल्ला अराफी?

अयातुल्ला अली खामेनी यांच्या उत्तराधिकारी होण्याच्या शर्यतीत अराफी हे प्रमुख आघाडीवर होते. ६७ वर्षीय हे एक अनुभवी धर्मगुरू आणि खामेनी यांचे जवळचे सहकारी आहेत. अराफी सध्या सर्वोच्च नेत्याची नियुक्ती करणाऱ्या तज्ञांच्या सभेचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. ते इराणच्या मदरसा प्रणालीचेही प्रमुख आहे. शनिवारी झालेल्या अमेरिका-इस्रायल लष्करी हल्ल्यात १९८९ पासून इराणचे नेतृत्व करणारे ८६ वर्षीय खामेनी ठार झाले. या कारवाईत लष्करी तळ, सरकारी सुविधा आणि वरिष्ठ कमांड साइट्सना लक्ष्य करण्यात आले, ज्यात संरक्षण मंत्री अमीर नासरजादेह आणि कांडर-इन-चीफ मोहम्मद पाकपूर यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. अंतरिम परिषदेत आता अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, मुख्य न्यायाधीश गुलाम होसेन मोहसेनी-एजेई आणि पालक परिषदेतील धर्मगुरू यांचा समावेश आहे. खामेनींच्या निधनानंतर हे तिघेही एकत्रितपणे राज्य कारभाराचे मार्गदर्शन करतील.

ताज्या बातम्या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा होरपळून...

0
वर्धा । Wardha 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. वर्धा जिल्हा हद्दीत उभ्या असलेल्या एका इथेनॉलच्या ट्रकला पुण्याकडून येणाऱ्या कारने...