Tuesday, June 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIsrael Iran Conflict : इस्त्रायलचा इराणवर हल्ला; अण्विक तळ उद्ध्वस्त

Israel Iran Conflict : इस्त्रायलचा इराणवर हल्ला; अण्विक तळ उद्ध्वस्त

क्षेपणास्त्रे नष्ट, सहा शास्त्रज्ञांचा मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये (Israel) संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू असताना आता इस्त्रायलने आणखी एका देशावर हल्ला केला. इस्रायलने काल शुक्रवारी इराणवर (Iran) ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात इराणच्या ६ अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू (Death) झाला. याबरोबरच अनेक लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. इराणचे सशस्त्र दलप्रमुख जनरल मोहम्मद बाघेरी आणि इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्म्सचे प्रमुख मेजर जनरल होसैन सलामी यांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणमधील प्रसार माध्यमांनी दिली आहे.

- Advertisement -

इराणला अणवस्त्रसंपन्न देश बनू देणार नाही, हे इस्रायल आधीपासून सांगत आहे. इराणवर मोठा हल्ला करून हेच त्यांनी आज सिद्ध केले. या हल्ल्यात इराणने आपल्या दोन खास माणसांना गमावले. आयआरजीसी चीफ ऑफ स्टाफ जनरल होसैन सलामी यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. इस्रायली सैन्याने (Army) इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला.

तसेच इराणी लष्करी आणि अणुतळांनादेखील लक्ष्य केले आहे. आयएएफच्या डझनभर फायटर विमानांनी इराणवरील हल्ल्याचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. ज्यात इस्त्रायलने इराणच्या विविध भागातील अण्वस्त्र ठिकाणांसह डझनभर लष्करी तळांवर हल्ले केले. इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या माहितीनुसार, तब्बल २०० हून अधिक लढाऊ विमानांचा वापर करून इराणमधील विविध ठिकाणी हल्ले करण्यात आले. त्यात इराणचे आणीबाणी नियंत्रण कमांडरही ठार झाले आहेत. या तिघांनाही आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा हिंसाचार घडवण्यात जबाबदार धरले जात होते.

सध्याच्या घडीला इराण अण्वस्त्र निर्मितीच्या अगदी जवळ आहे. इराणी राजवटीच्या हातात असलेली मोठ्या प्रमाणातील विनाशकारी शस्त्रे इस्रायल राष्ट्रासाठी आणि संपूर्ण जगासाठी धोकादायक आहेत. याच कारणातून इस्त्रालयने इराण-वर हल्ला केला आहे. त्यासाठी इस्त्रालयने लष्करी तळे आणि अण्वस्त्र ठिकाणांना लक्ष्य केले आहे. या तळांचे मोठे नुकसान करण्यात इस्रायल यशस्वी ठरला आहे. डॉ. मोहम्मद तेहरांची आणि डॉ. फेरेयदून अब्बासी या दोन अण्वस्त्र वैज्ञानिकांचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे इराणच्या अणुबॉम्ब (Bomb) विकसित करण्याच्या कार्यक्रमाला खीळ बसणार आहे.

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणच्या राजधानीत तेहरानमध्ये (Tehran) जोरदार स्फोट झाले. शहरभर धुराचे लोट दिसून आले. यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्राइल कात्झ यांनी संपूर्ण देशात विशेष आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. शाळांना बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्याला इराण काय प्रत्युत्तर देणार, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे. इराणने आक्रमक भूमिका घेतली तर जगात आणखी एका युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी हल्ले होतीलः ट्रम्प

इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही बदला घेण्याची घोषणा केली आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुकराराबद्दल मोठे विधान केले आहे. इस्रायलकडे अनेक धोकादायक शस्त्रे आहेत. इराणमध्ये कराराला विरोध करणारे सर्व मारले गेले. इराणकडे अजूनही संधी आहे. आता करार करा. अन्यथा, आणखी हल्ले होतील, आणखी विनाश होईल, असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.

शास्त्रज्ञांच्या मृत्यूने इराणला धक्का

इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात ६ अणू शास्रज्ञ ठार झाले आहेत. त्यात अब्दुल हमीद मिनोउचहर, अहमदरझा झोल्फाघारी, सय्यद अमीरहोसेन फेक्ही, मोत्लाबीज़ादेह, मोहम्मद मेहदी तहरेनची आणि फेरेदून अब्बासी ठार झाले आहेत. इराणच्या आण्विक कार्यक्रमाचे ते प्रमुख होते. या शास्रज्ञांच्या मृत्यूने अणू कार्यक्रमाला मोठा धक्का बसला आहे. इराणचे इस्लामिक आण्विक महासत्ता होण्याचे स्वप्न एक-दोन वर्षे मागे पडल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बदलीसाठी बोगस ‘आंधळे, पांगळे’ होणार्‍यांवर आता फौजदारी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातंर्गत बदली प्रक्रियेतून सुटका व्हावी अथवा सोय व्हावी, यासाठी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र, घटस्फोट, परितक्त्या असण्याची बोगस कागदपत्रे रंगवणार्‍या प्राथमिक शिक्षकांविरोधात आता...