Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजFire News : संसदेपासून जवळच असलेल्या खासदारांच्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग

Fire News : संसदेपासून जवळच असलेल्या खासदारांच्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग

नवी दिल्ली | New Delhi

संसद (Parliment) भवनापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या दिल्लीतील (Delhi) बीडी रोडवरील खासदारांच्या (MP) मालमत्तेतील ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला आज (शनिवार) भीषण आग लागली. राज्यसभेचे अनेक खासदार आणि त्यांचे कर्मचारी तिथे राहतात. यावेळी आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तर आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुरुवातील आग तळमजल्यावर लागल्याचे सांगितले जाते, त्यानंतर हीच आग चार मजल्यापर्यंत पसरली. आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

YouTube video player

दरम्यान, हा परिसर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील मानला जात असल्याने आगीमुळे स्थानिक लोक आणि अधिकारी वर्गाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच आग (Fire News) शमवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात असून, घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची वाहने तैनात करण्यात आली आहेत.

फ्लोअरबाहेर गोळा झाले होते लोक

आग लागल्यानंतरचे घटनास्थळावरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये पोलीस लोकांना बाहेर पडण्यासाठी विनवणी करत आहेत. तर बरेचसे लोक ग्राऊंड फ्लोअरबाहेर गोळा झालेले दिसत आहेत. अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दुपारी १ वाजून २० मिनिटांनी मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...