Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPadma Awards 2026 List : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील रघुवीर...

Padma Awards 2026 List : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील रघुवीर खेडकरांसह ‘या’ मान्यवरांचा होणार सन्मान

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. यामध्ये लोकनाट्य जपण्यात दिलेल्या योगदानाबद्दल कलाकार रघुवीर खेडकर (Raghuveer Khedkar) यांना पद्मश्री तर कापूस या पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केलेल्या परभणीच्या श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

तर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अर्मिडा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Award) जाहीर झाला आहे. तसेच पालघरमधील (Palghar) वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय आयुर्वेद तज्ञ डॉ. रामचंद्र आणि डॉ. सुनीता गोडबोले यानाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

YouTube video player

दरम्यान, राज्य सरकारने २००५ साली तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री कांताबाई सातारकर यांचा विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा प्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला होता.

पद्म पुरस्कार म्हणजे काय?

पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून, ते तीन प्रकारचे असतात. यात पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे हे तीन पुरस्कार आहेत. कला, समाजकार्य, प्रशासन, विज्ञान, व्यापर, उद्योग, आरोग्यसेवा, साहित्य, शिक्षण, खेळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर केला जातो.

पद्म पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी

भगवंदास रायकर (मध्य प्रदेश)
भिकल्या लडक्या धिंडा (महाराष्ट्र)
ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर)
चरण हेम्ब्रम (ओडिशा)
चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर)
कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल)
महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
ओथूवर तिरुथानी (तमिलनाडु)
रघुपत सिंह (उत्तर प्रदेश)
रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिलनाडु)
सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालैंड)
श्रिरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
थिरुवरूर बख्तवसलम (तमिलनाडु)
अंके गौड़ा (कर्नाटक)
आर्मिदा फर्नांडीस (महाराष्ट्र)
डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान)
खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा)
मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात)
मोहन नगर (मध्य प्रदेश)
नीलेश मंडलेवाला (गुजरात)
आर एंड एस गोडबोले (छत्तीसगढ़)
राम रेड्डी ममिडी (तेलंगाना)
सिमांचल पात्रो (ओडिशा)
सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक)
तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश)
युनम जत्रा सिंह (मणिपुर)
बुधरी ताथी (छत्तीसगढ़)
डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगाना)
डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिलनाडु)
हैली वॉर (मेघालय)
इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़)
के. पाजनिवेल (पुडुचेरी)
कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश)
नुरुद्दीन अहमद (असम)
पोकीला लेकटेपी (असम)
आर. कृष्णन (तमिलनाडु)
एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक)
टागा राम भील (राजस्थान)
विश्व बंधु (बिहार)
धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात)
शफी शौक़ (जम्मू-कश्मीर)
डॉ. रामचंद्र आणि डॉ. सुनीता गोडबोले (महाराष्ट्र)

ताज्या बातम्या