नवी दिल्ली | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतात आयफोन बनवण्याबद्दल पुन्हा एकदा अॅपलला धमकी दिली आहे. अमेरिकेत विकले जाणारे आयफोन भारतात किंवा इतर कोणत्याही देशात नव्हे, तर अमेरिकेतच बनवले पाहिजेत, नाहीतर २५ टक्के टॅरिफ द्यावा लागेल, असा इशारा त्यांनी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना दिला आहे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलसह (Apple) सॅमसंग (Samsung) आणि परदेशी स्मार्टफोन कंपन्यांवरही अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकन (American) बाजारपेठेतील निष्पक्ष स्पर्धेच्या आधारावर हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर ट्रम्प यांच्या निर्णयानंतर देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल असे सांगण्यात येत आहे. भारतात आयफोन निर्मिती करण्याच्या अॅपलच्या अडचणी वाढताना दिसत आहे. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनच याला विरोध होऊ लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी टिम कुक यांनी भारतात भारतात आयफोन निर्मित करू नका असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता टॅरिफचे (Tariffs) अस्त्र उपसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
#WATCH | Washington, DC: US President Donald Trump announced 25% tariffs on iPhones manufactured outside the US
US President Donald Trump says, " It would be more. It would also be Samsung and anybody that makes that product. Otherwise, it wouldn't be fair…when they build… pic.twitter.com/mo6t8PMlGd
— ANI (@ANI) May 23, 2025
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल टूथ या सोशल मीडियावर पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली. मी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना खूप आधीच सांगितले होते की, जर त्यांचे आयफोन जे अमेरिकेत विकले जातील. ते अमेरिकेमध्येच तयार झाले पाहिजेत, ना भारतात किंवा इतर देशामध्ये. जर असे झाले नाही, तर अमेरिकेमध्ये अॅपलला कमीत कमी २५ टक्के टॅरिफ द्यावा लागेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी टिम कुक आणि अॅपलला दिला आहे.
सॅमसंग फोनही अमेरिकेत होणार महाग
डोनाल्ड ट्रम्प माध्यमांशी बोलतांना म्हणाले की,” अॅपलवर २५ टॅरिफ लावण्यात येत असल्याने अमेरिकेत उत्पादन न करणाऱ्या सॅमसंगसारख्या ब्रँडना वगळणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे भारतात आणि इतर आशियाई देशांमध्ये बनवले जाणारे आणि अमेरिकेत विकले जाणारे सॅमसंग स्मार्टफोन देखील अतिरिक्त शुल्काच्या अधीन असतील”, असे त्यांनी सांगितले.