नवी दिल्ली | New Delhi
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांच्यासह कमांडर पैगी व्हिट्सन, पोलंडचे स्लावोज उज्नान्स्की-विस्नीव्स्की आणि हंगरीचे टिबोर कापू हे चार अंतराळवीर पृथ्वीवर (Earth) परतले आहेत. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले आहे. शुभांशू हे तब्बल १८ दिवस अवकाशात होते. काळात त्यांनी अनेक प्रयोगही केले.
शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांनी एक्सिओम-४ मिशन (Axiom-4 Mission) पूर्ण केल्यानंतर २२.५ तासांच्या परतीच्या प्रवास पूर्ण करत पृथ्वीवर परत आले आहेत. शुभांशू शुक्ला हे स्पेस मिशनवर (Space Mission) गेलेले भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत. त्यानंतर त्यांनी एक्सिओम -४ मिशन यशस्वीरित्या पूर्ण केले असून, त्यांच्या आगमनाची संपूर्ण देशाला उत्सुकतेने वाट बघत होता.
शुक्ला यांच्यासह सर्व अंतराळवीर ड्रॅगन ‘ग्रेस’ अंतरिक्ष यानातून भारतीय वेळेनुसार (Indian Time) सोमवार संध्याकाळी ४:४५ वाजता ISS पासून वेगळे झाले होते. त्यानतंर ड्रॅगन अंतरिक्ष यान आणि एक्सिओम स्पेस एएक्स-४ च्या सर्व सदस्यांनी आज (मंगळवारी) भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०१ वाजता पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला.
दरम्यान, त्यांच्या यान सॅन डिएगोच्या किनाऱ्यावरील पाण्यात (Water) उतरले. यावेळी यान पृथ्वीवर उतरायच्या आधी एक सौम्य धमाका करून त्यांच्या आगमनाची घोषणा केली. शुभांशू शुक्ला हे २५ जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन ९ रॉकेटने अंतराळात गेले होते. त्यानंतर आता ते सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत.
शुभांशू भारताचे दुसरे अंतराळवीर
शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत. यापूर्वी राकेश शर्मा (Rakesh Sharma) यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता. शुभांशू यांच्या या मोहिमेनंतर भारत आगामी काळात अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शुभांशू यांची ही मोहीम खास आहे.




