नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू (Death) झाला होता. यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील तब्बल ९ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत बदला घेतला. यानंतर आज पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून, या घटनेत तीन दहशतवादी ठार (Killed) झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. काश्मीरमध्ये लपलेल्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध भारतीय सैन्य दलाकडून घेतला जात आहे. या शोध मोहिमवेळी भारतीय सैन्याला शोपियनमध्ये (Shopian) दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सैन्याने दहशतवाद्यांना घेराव घातला असता यावेळी झालेल्या चकमकीमध्ये काही मिनिटांमध्येच एक दहशतवादी ठार झाला तर त्यानंतर दोन तास सुरू असलेल्या चकमकीमध्ये आणखी दोन दहशतवादी ठार झाले.
J&K | Three terrorists of Lashkar-e-Taiba have been killed in an exchange of fire with security forces in Shukroo forest area of Keller in South Kashmir’s Shopian district.
A top police officer said that a massive cordon and search operation was launched in the forests of Kellar… pic.twitter.com/X8QOA2VmXp
— ANI (@ANI) May 13, 2025
दरम्यान, हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी सबंधित असून, यातील दोघांची ओळख पटली आहे.
तसेच लष्कराने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, राष्ट्रीय रायफल्स युनिटला (Rashtriya Rifles Unit) दहशतवादी असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर शोध सुरू केली होती. या मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार (Firing) सुरू केला. त्यानंतर झालेल्या तीव्र चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून, ऑपरेशन अद्याप सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन दहशतवाद्यांची ओळख पटली
चकमकीत ठार करण्यात आलेल्या तिघा दहशतवाद्यांपैकी दोघांची ओळख पटवण्यात यश आले आहे. यातील एकाचे नाव शाहिद कुट्टय रा. छोटीपोरा हीरपोरा, शोपियान असे असून, त्याचा ८ एप्रिल २०२४ रोजी डॅनिश रिसॉर्टमध्ये झालेल्या गोळीबारात सहभाग होता. या गोळीबारात दोन जर्मन पर्यटक आणि एक ड्रायव्हर जखमी झाले होते. याशिवाय १८ मे २०२४ रोजी शोपियानच्या हीरपोरा येथे भाजप सरपंचाच्या हत्येतही शाहिद कुट्टयचा सहभाग होता. तसेच ३ फेब्रुवारी २०२५ रोजी कुलगामच्या बेहीबाग येथे टीए कर्मचाऱ्यांच्या हत्येतही त्याचा सहभाग असल्याचे समजते. तसेच दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव अदनान शफी असे असून तो वंदुना मेल्होरा, शोपियानचा रहिवासी आहे. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी शोपियानमधील वाची येथे झालेल्या एका स्थानिक कामगाराच्या हत्येत अदनानचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.