Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट; लोकांमध्ये भीतीचे वातावरण,...

मोठी बातमी! लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट; लोकांमध्ये भीतीचे वातावरण, तीन कारच्या चिंधड्या

नवी दिल्ली | New Delhi

राजधानी दिल्लीमधील (Delhi) लाल किल्ला परिसरात (Read Fort Area) उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट (Explosion) झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका कारमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवारी) सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हा स्फोट झाल्याचे समोर आले असून, या स्फोटानंतर तीन वाहनांना आग लागल्याचे समजते. मेट्रो स्टेशन परिसरात हा स्फोट झाला असून, स्फोटात काही जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

YouTube video player

दरम्यान, गर्दीच्या वेळी हा स्फोट झाला असून, दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच हा स्फोट नेमका कशामुळे झाला, त्याचे कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही. लाल किल्ल्यापासून ८०० मीटर अंतरावर हा स्फोट झाला आहे.

दहशतवादी हल्ल्याची शक्यता

गेल्या चार दिवसात ०७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत दिल्ली पोलिसांनी कारवाई करत काही संशयितांना पकडले आहे. त्यामध्ये आयसीसच्या चार दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटामुळे संशय अधिक बळावला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...