Wednesday, January 7, 2026
Homeमुख्य बातम्याNISAR Satellite Mission Launch : इस्त्रोचे 'निसार' मिशन लॉन्च; नैसर्गिक आपत्तींची आधीच...

NISAR Satellite Mission Launch : इस्त्रोचे ‘निसार’ मिशन लॉन्च; नैसर्गिक आपत्तींची आधीच मिळणार माहिती

नवी दिल्ली | New Delhi

भारताची अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज (बुधवार) भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीत तयार झालेले NISAR (नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार) सॅटेलाईट ५:४० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन (Satish Dhavan) अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. या सॅटेलाईटला पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर म्हणून ओळखले जाते.

- Advertisement -

निसार उपग्रह (Nisar Satellite) हा मानवी कौशल्यांची देवाणघेवाण आणि तांत्रिक सहकार्याचा परिणाम आहे. जो दोन्ही अंतराळ संस्थांमध्ये एक दशकाहून अधिक काळ सुरू होता. हा उपग्रह दर १२ दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचे स्कॅनिंग करतो आणि भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची (Natural Disaster) आधीच माहिती देण्यास सक्षम असेल.

YouTube video player

दरम्यान, निसार हे जगातील पहिले असे सॅटेलाईट आहे, जे दोन रडार फ्रिक्वेन्सी (एल-बँड आणि एस-बँड) चा वापर करुन पृथ्वीच्या पृष्ठभाग स्कॅन करेल. ही १३ हजार कोटी रुपयांची (१.५ अब्ज डॉलर्स) मोहीम असून इस्रोचे ७८८ कोटी रुपयांचे योगदान आहे. त्याचा डेटा जगभरातील शास्त्रज्ञ, सरकार आणि सर्वसामान्य जनतेला मोफत उपलब्ध होणार आहे.

नैसर्गिक आपत्तींची आधीच मिळणार माहिती

भूकंप आणि ज्वालामुखी – निसार जमिनीच्या पृष्ठभागाच्या लहान हालचाली मोजू शकतो. यात भूकंपापूर्वी फॉल्ट लाइन्समधील (पृथ्वीच्या क्रॅक) हालचाली टिपल्या जातात. ज्या ठिकाणी भूकंपाचा धोका जास्त आहे अशा ठिकाणांना हे चिन्हांकित करू शकते.

त्सुनामी – त्सुनामीच्या इशाऱ्यासाठी भूकंपाची अचूक माहिती आवश्यक असते. निसार भूकंपापूर्वी आणि नंतर जमिनीच्या हालचालींची माहिती देईल, ज्यामुळे त्सुनामीच्या संभाव्यतेचा अंदाज बांधण्यास मदत होईल. तसेच किनारपट्टी भागातील पूरस्थितीवर ही समिती लक्ष ठेवणार आहे.

भूस्खलन – निसार डोंगराळ भागातील माती आणि खडकांची हालचाल पकडू शकते, त्यामुळे भूस्खलनाचा धोका अगोदरच ओळखता येतो. भारतासारख्या देशांसाठी हे खूप महत्वाचे आहे, जिथे हिमालयीन प्रदेशात भूस्खलन होते.

पूर आणि वादळे – निसार नदी आणि तलावांमधील जमिनीतील ओलावा आणि पाण्याची पातळी मोजू शकते. हे पुराच्या वेळी पाण्याच्या प्रसाराचा मागोवा घेईल, ज्यामुळे मदत कार्यात मदत होईल. तसेच वादळांच्या प्रभावावर ही नजर ठेवली जाणार आहे.

पायाभूत सुविधांचे निरीक्षण – निसार धरणे, पूल आणि इतर संरचनांच्या सभोवतालच्या जमिनीच्या हालचाली मोजून त्यांची स्थिरता मोजेल. यामुळे संरचना कोसळण्याचा धोका आधीच जाणून घेण्यास मदत होऊ शकते.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...