Wednesday, January 7, 2026
HomeराजकीयNarendra Modi : कोणाच्याही सांगण्यावरून शस्रसंधी नाही, भारताला जगभरातून पाठिंबा - पंतप्रधान...

Narendra Modi : कोणाच्याही सांगण्यावरून शस्रसंधी नाही, भारताला जगभरातून पाठिंबा – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | New Delhi

काही महिन्यांपूर्वी पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Terrorist Attack) बदला घेण्यासाठी भारताच्या संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या मोहिमेंतर्गत भारताच्या (India) संरक्षण दलांनी ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांना लक्ष्य केलं होतं. मात्र चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी १० मे रोजी युद्धविराम घोषित करण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

याच युद्धविराम, पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरचे ऑपरेशन सिंदूर अभियान यावर संसदेत कालपासून (सोमवार) चर्चा सुरु झाली होती. आज (मंगळवार) देखील या विषयावर दोन्ही बाजूंच्या खासदारांकडून चर्चा झाली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राहुल गांधींनी (Rahul Gandhi) यावर भाषण केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत पंतप्रधानांना आव्हान दिले. यानंतर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पहलगाम हल्ल्याबाबत आणि ऑपरेशन सिंदूरवर माहिती देतांना काँग्रेसवर जोरदार पलटवार केला.

YouTube video player

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरवरील (Operation Sindoor) चर्चा भारतासाठी गौरवाची बाब आहे. संसदेतील सत्र भारताचा विजयोत्सव आहे. हे सत्र दहशतवाद्यांना मातीत गाडण्याचा विजयोत्सव आहे. मी संसदेत भारताची बाजू मांडायला उभा राहिलो आहे. ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना आरसा दाखवायला उभा आहे. देशात दंगली घडवण्याचं षडयंत्र रचण्यात आलं होतं. निष्पाप नागरिकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्या. मात्र, भारतीयांनी षडयंत्र मोडित काढलं. मी २२ एप्रिल रोजी परदेशात होतो. परदेशातून परतल्यानंतर तातडीने बैठक बोलावली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या आकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या सूचना दिल्या”, असेही त्यांनी म्हटले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “आमच्या सैन्यदलाच्या संकल्पावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिली. त्यांनीच ठरवावं की कुठे आणि कधी हल्ला करायचा, सैन्याला सर्व अधिकार दिले. त्यानंतर सैन्याने अशी कारवाई केली की त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणारे आजही थरथरत आहेत. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी एअरबेस आजही आयसीयूमध्ये आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने त्यांची ताकद दाखवली. पाकिस्तानने दिलेल्या न्यूक्लिअर धमक्यांना भारताने भीक घातली नाही. याआधी दहशतवाद्यांना पोसणारे निश्चिंत असायचे. एखादा हल्ला केला तर त्यामागचे आका निवांत असायचे. पण आता त्या आकांना झोप येत नाही. त्यांना माहिती आहे, असं काही केलं तर भारत येईल आणि त्यांना सोडणार नाही”, असेही नरेंद मोदी यांनी म्हटले.

तसेच “सिंधूपासून ते सिंदूरपर्यंत भारताने (India) कारवाई केली आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर केवळ तीन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. तर भारताच्या बाजूने जगभरातून पाठिंबा मिळाला. जगभरातून समर्थन मिळाले पण माझ्या देशातील विरांना काँग्रेसचे समर्थन मिळाले नाही हे दुर्दैव आहे. पहलगामच्या हल्यानंतर मोदींची ५६ इंच छाती कुठे गेली असा प्रश्न विचारण्यात आला. दहशतवादी हल्ल्यानंतरही काँग्रेसने राजकारण केले. काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाच्या सैन्यबलाचे मनोबल कमी होत होते. काँग्रेसला ना भारताच्या सामर्थ्थावर विश्वास आहे ना भारतीय सैन्यावर. १० मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्याची घोषणा केली. पण येथील काही लोकांनी सैन्यावर विश्वास न दाखवता अफवा पसरवण्यावर भर दिला”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कोणत्याही जागतिक नेत्याशी चर्चा न करता श्स्त्रविरामाचा निर्णय घेतला

भारताने कोणत्याही जागतिक नेत्याच्या सांगण्यावरून शस्त्रविराम केलेला नाही. ९ मे रोजी रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मी काही वेळाने त्यांच्याशी बोललो. उपराष्ट्राध्यक्षांनी मला सांगितले की, पाकिस्तान मोठा हल्ला करणार आहे. मी त्यांना ठणकावून सांगितले की, पाकिस्तानने असा काही प्रयत्न केला तर त्यांना महागात पडेल. आम्ही मोठा हल्ला करून त्यांना उत्तर देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगितले.

संयुक्त राष्ट्रासह १९० देशांपैकी फक्त ३ देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला

ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगातील कोणत्याही देशाने भारताला स्वसरक्षणाच्या कारवाईपासून रोखले नाही. संयुक्त राष्ट्रातील १९० देशांपैकी फक्त केवळ तीन देशांनी पाकिस्तानच्या बाजूने विधान केले. पण इतर सर्व देशांचे समर्थन भारताला लाभले. जगाचे समर्थन आपल्याला मिळाले. पण दुर्दैव हे आहे की, काँग्रेसचे समर्थन मिळू शकले नाही.

पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली

२ मेच्या मध्यरात्री आणि १० मेच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या अनेक तळांवर हल्ले केले. भारतीय सैन्याने असा हल्ला केला की पाकिस्तानने त्याचा विचारही केला नव्हता. त्यामुळे पाकिस्तान गुडघ्यावर आले. त्यावेळी पाकिस्तानचा पहिला फोन आला. डीजीएमओला पाकिस्तानकडून फोन आला आणि भारताला हल्ले थांबवण्याची विनंती केली.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...