Tuesday, November 5, 2024
Homeमुख्य बातम्याParliament Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन 'या' तारखेपासून; अनेक मोठी विधेयके मांडली...

Parliament Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन ‘या’ तारखेपासून; अनेक मोठी विधेयके मांडली जाणार

नवी दिल्ली | प्रतिनिधी | New Delhi

संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Parliament) २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज (मंगळवारी) ही घोषणा केली. या अधिवेशनात (Convention) अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra News : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती

मंत्री किरेन रिजिजू (Minister Kiren Rijiju) यांनी एक्सवर (ट्विट) म्हटले की, राष्ट्रपतींनी भारत सरकारच्या शिफारशीनुसार २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीत हिवाळी अधिवेशन २०२४ साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी (Approval) दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Political : महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर; गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप, म्हणाले लोकसभेला…

जुन्या संसद भवनात होणार संविधान दिन साजरा

२६ नोव्हेंबर रोजी राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सरकार संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आयोजित करेल.संविधान सदनाच्या (जुने संसद भवन) सेंट्रल हॉलमध्ये विशेष संयुक्त बैठक होणार आहे.१९४९ मध्ये येथे संविधान स्वीकारण्यात आले. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू झाली. संविधान दिन हा मुळात राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जात होता.२०१५ मध्ये, भाजप सरकारने बी.आर.आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे नाव बदलून संविधान दिन केले.

हे देखील वाचा : Chhatrapati Shahu Maharaj : कोल्हापूरातील राड्यावर छत्रपती शाहू महाराजांनी पत्राद्वारे दिले स्पष्टीकरण; म्हणाले, “आमचं आधीच…”

हिवाळी अधिवेशनात ‘वन नेशन वन इलेक्शन’विधेयक मांडले जाऊ शकते

केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात ‘एक देश एक निवडणूक’विधेयक आणि वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मांडू शकते. जेपीसी सध्या दोन्हीचा आढावा घेत आहे. नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार एक देश, एक निवडणूक या दिशेने काम करत असल्याचे संकेत दिले होते. या अंतर्गत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या