Saturday, May 17, 2025
Homeभविष्यवेधग्रहांची प्रकृती व स्वभाव

ग्रहांची प्रकृती व स्वभाव

ज्योतिष शास्त्रात एकूण नऊ ग्रह आहेत. त्यात सूर्य, चंद्र, गुरू, शुक्र, मंगळ, बुध आणि शनी हे मुख्य ग्रह असून राहू-केतू उपग्रह आहेत.

- Advertisement -

या ग्रहामध्ये सूर्य-मंगळ क्रूर ग्रह आणि शनी, राहु, केतू हे पाप ग्रह आहेत. सूर्य आपले डोळे, डोके आणि हद्यावर प्रभाव टाकतो. मंगळ पित्त, रक्त, कान, नाकावर तर शनी हाडे, मेंदू, पायांवर प्रभाव पाडतो.

राहू-केतूचा स्वतंत्र प्रभाव पडत नाही. ते ज्या राशीत ज्या ग्रहांबरोबर असतात त्याचा प्रभाव वाढविण्याचे काम करतात.

गुरू, शुक्र, बुध हे शुभ ग्रह समजले जातात. पूर्ण चंद्रही शुभ असतो. परंतु, कृष्ण पक्षाकडे वाढणारा चंद्र पापी समजला जातो. गुरू शरीरातील चरबी आणि पचनक्रियेस नियंत्रित करतो. शुक्र वीर्य, डोळे आणि कामशक्तीवर नियंत्रण ठेवतो. बुधाचे वर्चस्व वाणीवर असते. चंद्र छाती आणि डोळ्यांवर प्रभाव टाकतो.

जन्मकुंडलीत 12 भाव असतात. सूर्य- प्रथम भाव, दशम भाव चंद्र, चतुर्थ भाव शनी, षष्ठ आणि अष्टम भाव शुक्र, सप्तम भाव मंगळ असून तृतीय आणि षष्ठ भाव गुरू आहे. द्वितीय, पचंम, नवम, एकादश भाव बुध आहे. विशेष- जर भावकारक त्या भावात एकटा असेल तर त्या भावाचे नुकसानच करतो.

ग्रहांचे स्थान व परिणाम : चंद्र, शुक्र व बुध ज्या स्थानवर बसतात त्यांची वृध्दी करतात. गुरू ज्या घरात बसतो त्याचे नुकसान करतो. परंतु, ज्या घरात पाहतो त्याचा फायदा करतो. मंगळ जेथे बसतो तेथे व पाहतो त्या सर्वांचे नुकसान करतो.

सूर्य आपल्या स्थानानुसार लाभ देतो, (दशममध्ये सर्वांत जास्त) किंवा नुकसान करतो. शनी ज्या घरात बसतो त्या घरात फायदेशीर ठरतो. परंतु, ज्याकडे पाहतो त्याचे नुकसान करतो.

ग्रहांची दृष्टी :

सर्व ग्रह आपल्या सातव्या स्थानाकडे पूर्ण दृष्टीने पाहतात. गुरूस पाचवी आणि नववी दृष्टीसुध्दा असते. मंगळ चौथ्या आणि आठव्या स्थानाकडे पाहतो. राहू केतू क्रमश: पाचव्या आणि नवव्या स्थानाकडे पूर्ण दृष्टीने पाहतो.

1. कुंडलीत त्रिकोणाचे (5-9) स्वामी नेहमी शुभ असतात.

2. केंद्राचे स्वामी (1-4-7-10) शुभ ग्रह असतील तर ते अशुभ फळ देतात. परंतु, अशुभ ग्रह शुभ फळ देतात.

3. 3-6-11 भावांचे स्वामी पाप ग्रह असतील तर वुध फायदेशीर ठरेल. परंतु, शुभ ग्रह नुकसान करतील.

4. 6-8 -12 भावांचे स्वामी जेथे असतील त्या ठिकाणी नुकसानच करतील.

5. सहाव्या स्थानावर गुरू, आठव्यावर शनी आणि दाहाव्या मंगळ शुभ असतो.

6. केंद्रात शनी (विशेषता: सातव्यामध्ये) अशुभ असतो. परंतु अन्य ठिकाणी शुभ फळ देतो.

7. दुसर्‍या, पाचव्या, सातव्या स्थानावर केवळ गुरूच नुकसान करतो.

8. अकराव्या स्थानावर सर्वच ग्रह शुभ असतात. केतू विशेष फलदायक असतो.

9.ज्या ग्रहांवर शुभ ग्रहांची द्दष्टी होते ते शुभ फळ देतात.

विशेष : लग्नाच्या स्थितीनुसार ग्रहांची शुभ-अशुभ परिणामात बदल होतो. जसे सिंह लग्नासाठी शनी अशुभ, परंतु तुळ लग्नासाठी अतिशय शुभ असते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ज्योती

Who Is Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi हरियाणातील ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसारची रहिवासी असलेली ज्योती मल्होत्राला कैथल...