Saturday, October 5, 2024
Homeनाशिकआदिमायेचा आजपासून जागर; सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सव, आज घटस्थापना

आदिमायेचा आजपासून जागर; सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सव, आज घटस्थापना

सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptashrungigad

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर (Saptshringigad) सप्तशृंगी देवीची गुरुवारी (दि.३) पंचामृत महापूजा सकाळी सात वाजता होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना (Ghatstaphana) होऊन नवरात्रोत्सवास (Navratri Festival) प्रारंभ होईल. नवरात्रकाळात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे उत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : ड्रग्ज तस्करीच्या नावे गंडा; साडेतीन लाख उकळले

नवरात्रोत्सव १२ ऑक्टोबरदरम्यान असणार आहे. कावड यात्रा (Kawad Yatra) कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) उत्सव १६ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत होईल. या कालावधीत ट्रस्टतर्फे तसेच विविध संस्थांतर्फे धार्मिक कार्यक्रम होतील. याच कालावधीत विविध सेवाभावी संस्था गडावर व गडाकडे येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहेत. नवरात्रोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या अश्विन शुद्ध महानवमीच्या दिवशी सकाळी सात वाजता पंचामृत महापूजा, दुपारी चारला न्यासाच्या कार्यालयात कीर्तिध्वजाचे पूजन होईल.

हे देखील वाचा : Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहि‍णीं’ची दिवाळी होणार दणक्यात साजरी; ‘या’ तारखेपर्यंत मिळणार दोन महिन्यांचे एकत्रच पैसे

ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबियाकडे ध्वज सुपूर्द केला जाईल. त्यानंतर ध्वजाची वाजत गाजत मिरवणूक (Procession) काढण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता श्री भगवती मंदीर सभामंडपात शतचंडी याग व होमहवन पूजा होणार आहे. याच दिवशी रात्री बाराला श्री भगवती शिखरावर कीर्तीध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील ध्वजारोहण करतील, शनिवारी (दि.१२) विजयादशमीला सकाळी दहाला शतचंडी याग व पूर्णाहुती होईल, त्यानंतर गडावर दसरा साजरा करण्यात येईल.

हे देखील वाचा : शरद पवारांचा छगन भुजबळांविरुद्ध उमेदवार ठरला? ‘या’ नेत्याने घेतली जयंत पाटलांची भेट

खासगी वाहनांना गडावर बंदी

गडावर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरपर्यंत खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये भाविकांसह प्रवासी वाहतूक सुरू राहील. पायी दर्शन करण्यासाठी अनेक ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल कधी वाजणार? समोर आली ‘ही’ तारीख

आज आभूषणे मिरवणूक

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेची पंचामृत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद डी. जगमलानी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी पहाटे ६ वाजता ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात देवीच्या आभूषणांचे पूजन ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर या आभूषणांची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. विश्वस्त अॅड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर उपस्थिती राहणार आहेत. मंदिर परिसर, डोम व ट्रस्टच्या इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशी माहिती ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या