Thursday, January 8, 2026
Homeमहाराष्ट्रNawab Malik : नवाब मलिकांच्या जावयाचा भीषण अपघात; कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी...

Nawab Malik : नवाब मलिकांच्या जावयाचा भीषण अपघात; कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पाय पडला अन्…

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात झाला आहे. कार चालकाचा पाय चुकून एक्सलेटरवर पडल्यामुळे मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) गाडीसोबत फरफटत गेले.

- Advertisement -

या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर ‘आयसीयू’मध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयातून रेग्यूलर चेकअप करून घरी परतत असताना अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

YouTube video player

दरम्यान, यावेळी समीर खान यांच्या पत्नी आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर (Nilofer) या देखील सोबत होत्या. त्यांच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...