Thursday, January 8, 2026
Homeमहाराष्ट्रSameer Khan Death : नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचे निधन; कुटुंबावर...

Sameer Khan Death : नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचे निधन; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिकांचे (Nawab Malik) जावई समीर खान (Sameer Khan) यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी समीर खान यांचा अपघात (Accident) झाला होता. या अपघातात ते भीषण जखमी झाले होते त्यामुळे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असतानाच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेबाबतची माहिती स्वत नवाब मलिक यांनी ट्विट (एक्स) या सोशल मिडिया अकाऊंटवरून दिली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

YouTube video player

समीर खान हे नवाब मलिक यांची मोठी मुलगी निलोफर मलिक हिचे पती होते. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर व त्यांचे पती समीर खान क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये (Kriti Care Hospital) नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले होते. त्यानंतर तपासणी झाल्यानंतर घरी येण्यासाठी ते कारची वाट बघत उभे होते. त्यावेळी त्यांच्याच ड्रायव्हरने त्यांच्यावर गाडी घातली होती. कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी हे गाडी घेऊन आले असता त्यांचा पाय अचानक कारच्या एक्सलेटरवर ठेवला गेल्याने थार कार थेट समीर खान यांच्या अंगावर गेली.

हे देखील वाचा : Nashik News : प्रॉडक्ट कंपनीच्या गोडाऊनला आग लागल्याने लाखोंचे नुकसान

या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते यानंतर त्यांना लगेच क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या घटनेत त्यांच्या मेंदूला मार लागला होता. त्यानंतर मध्यंतरी समीर खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली होती. मात्र उपचार (Treatment) सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे मलिक कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याचे आणि सभेच्या बंदाेबस्ताचे पोलिसांकडून नियाेजन सुरु

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीनगर-माणकूर मतदारसंघातून उमेदवार (Candidate) आहेत. तर त्यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगरच्या उमेदवार आहे.मात्र,ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे अणुशक्तीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : ‘वारसां’ना किती मिळणार मतदारांची ‘पसंती’?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिका निवडणूक (Mahapalika Election) म्हटले की, केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक समीकरणे, आरक्षणाचे गणित आणि राजकीय वारसा यांचीही चर्चा...