Sunday, March 30, 2025
Homeमनोरंजननवाझुद्दीन सिद्दीकीवर पत्नी आलियाने केले गंभीर आरोप

नवाझुद्दीन सिद्दीकीवर पत्नी आलियाने केले गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आलियाने नवाझुद्दीन विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. तिने या तक्रारीमध्ये बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. तिने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

आलिया सिद्दीकीच्या वकिलांनी अशी माहिती दिली आहे की, त्यांनी भादवी कलम 375, 376 (के), 376 (एन), 420 आणि 493 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. आलियाने गेल्या आठवड्यामध्ये एका दुसऱ्या तक्रारीसंदर्भात उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या बुढाना पोलीस ठाण्यात तिचा जबाब नोंदवला होता. यामध्ये आलियाने नवाझ आणि त्याच्या कुटुंबातील 4 अन्य सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.

काही दिवसांपूर्वी आलियाने तिच्या सोशल मीडियावर नवाझुद्दीनच्या नावाने खुले पत्र लिहले होते. ट्विटरवर तिने शेअर केलेल्या या पत्रात तिने नवाझ आणि त्याच्या कुटुंबीयांवर तिखट शब्दात टिका केली होती आणि तिने हे स्पष्ट केले होते की ती तिच्या सासरच्या माणसांसमोर नमते घेणार नाही. आलियाने नवाझचे भाऊ आणि पीआरवर देखील जोरदार टीका केली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर मंदिरात बुंदी लाडू प्रसाद विक्री केंद्र सुरू

0
त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये देखील आलेल्या भाविकांना आता अल्पदरात बुंदीच्या लाडूचा प्रसाद मिळणार आहे. विश्वस्त स्वप्नील शेलार आणि...