Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेशकाल 'हिडमा' ठार, आज टेक्निकल प्रमुख 'टेक शंकर'सह ७ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा...

काल ‘हिडमा’ ठार, आज टेक्निकल प्रमुख ‘टेक शंकर’सह ७ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दल-नक्षल्यांमध्ये भीषण चकमक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात सुरक्षा जवान आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाल्याची माहिती समोर येत आहे. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाल्याची माहिती मिळत आहे. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली भागात सुरक्षा दलाकडून दुसऱ्या नक्षलविरोधी कारवाई सुरू आहे. बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.

मारेडुमिल्ली आणि जीएम वालसा जंगल परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. मंगळवारी एक टॉप नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा यालाही ठार करण्यात मोठे यश सुरक्षा दलांना आले. एडीजी महेश चंद्र लड्ढा यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बुधवारीही कारवाई सुरू ठेवली. आज सकाळपर्यंत तीन महिला माओवाद्यांसह सात नक्षलवादी मारण्यात यश आले.

- Advertisement -

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये मेटुरू जोगाराव उर्फ टेक शंकर आहे. हा आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटीच्या तांत्रिक शाखेचा प्रमुख होता. सुरक्षा यंत्रणांच्या मते, टेक शंकरनेच मागील काही वर्षांत छत्तीसगड व आंध्र-ओडिशा क्षेत्रात लँडमाइन व IED हल्ल्यांचे डिझाइन आणि अंमलबजावणी केली होती. शस्त्रनिर्मिती, संचार प्रणाली, स्फोटकांची रचना या बाबतीत त्याला विशेष कौशल्य असल्याने त्याला संघटनेचा “टेक्निकल प्रमुख” मानला जात असे.

YouTube video player

टेक शंकर हा २० वर्षांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी होता. सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या सततच्या कारवाईमुळे त्याच्या हालचाली मर्यादीत झाल्या. तो दक्षिण भारतात सक्रिय झाला होता आणि संघटनेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत होता.

गेल्या काही महिन्यांत आंध्र-ओडिशा सीमावर्तीभागात नक्षली हालचाली वाढल्याचे इनपुट मिळत होते. नक्षली गटांनी जंगलात नवीन अड्डे उभारणे, जुन्या कॅडरला सक्रिय करणे आणि छत्तीसगडच्या दिशेने येणाऱ्या गटांना प्रवेश देण्याच्या हालचाल सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर ग्रेहाउंड्स आणि इतर सुरक्षा पथकांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन सुरू केले. त्याच मोहिमेचा परिणाम म्हणून बुधवारी सकाळी तीव्र चकमक झाली.

दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये चकमक झाल्यानंतर पोलिसांनी शहरामध्ये सक्रिय असलेल्या माओवाद्यांच्या तुकड्यांवर कारवाई केली आहे. यात दहा पुरुष आणि पाच महिलांना अटक करण्यात आले. केंद्रीय माओवाद अनुयायी संघटनेचे सदस्य असून “एल्लूर” च्या ग्रीन सिटीमधील एका घरात असल्याच्या माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. यांच्याकडून काही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. माओवाद्यांच्या नेता हिडमा ठार झाल्यामुळे माओवादी संघटनेची दहशत गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, तेलंगाना, आंध्रप्रदेश उडीसा या राज्यात कमी झालेली आहे.

गेल्या काही दिवसांत एनटीआर, कृष्णा, काकीनाडा, कोनसीमा आणि एलुरु जिल्ह्यांतून एकूण 50 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या अटकांमध्ये केंद्रीय समिती, राज्य समिती, एरिया कमिटी आणि प्लाटून स्तरावरील महत्त्वाच्या सदस्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोर कॅडर एकाचवेळी पकडले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी 45 रायफल/बंदुका, 272 जिवंत काडतुसे, 2 मॅगझीन, 750 ग्रॅम वायर (IED साठी वापरली जाणारी), तांत्रिक उपकरणे आणि स्फोटकांसंबंधित इतर दस्तऐवज जप्त केली आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...