Tuesday, March 25, 2025
Homeराजकीयभरपावसात अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले…

भरपावसात अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले…

बारामती | Baramati

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा आज बारामतीत पार पडला. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर पावसात भाषण केले. यावेळी अजित पवारांनी सरकारने सुरू केलेल्या योजनांचा पाढा वाचला. त्याबरोबर ‘हौशे, नवशे, गवशे’ म्हणत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व महिलांना ‘लाडकी बहिण योजने’चा फायदा मिळणार आहे. तीन गॅस सिलेंडरचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. बारामतीतील महिलांना ‘लाडकी बहीण योजने’साठी वर्षांला १८० कोटी रूपये मिळणार आहेत. महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण योजने’साठी ४६ हजार कोटी रूपये मिळणार आहेत. काही-काही राज्यांचे बजेट एवढे नाहीत.

हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा” – आमदार खोसकर

Live: बारामती येथील 'जन सन्मान रॅली' #राष्ट्रवादी_जनसन्मान_रॅली #NCPJanSanmanRally

तसेच, महिला सक्षम आणि आत्मनिर्भर होण्यासाठी ‘लाडकी बहीण योजने’तून वर्षांला १८ हजार रूपये देण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे. पण, त्यासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायचं आहे. तर, ‘लाडकी बहीण योजना’ पुढे चालणार आहे. हौशे, नवशे, गवशे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, विश्वास ठेवून नका. हा अजितदादा शब्दांचा पक्का आहे. त्यात कुठेही बदलणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.

शाहु-फुल-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात काम करत असताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ असा शब्द मी देतो, असं अजित पवार यांनी म्हटलं. सत्ता येत सत्ता जाते. सत्तेसाठी आम्ही हापापलेलो नाहीत. मिळालेल्या सत्तेचा वापर गरीबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी झाला पाहिजे. कालच मी अमित शाह यांना भेटलो. आरक्षणाबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.

हे देखील वाचा : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार; शुटरचा खात्मा

महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. आम्ही कुठेही कांदा आयात केला नाही. दुधाची पावडर आयात केली नाही. दुधाचे दर वाढत नाही तोपर्यंत प्रतिलिटरला सरकारने ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील लोकांना ही भाजीपाला दूध वाजवी दरात मिळाला पाहिजे. पण शेतकऱ्यालाही त्याची चांगली किंमत मोबदला मिळाला पाहिजे. उसाचा एफआरपी वाढला मात्र एमएसपी गेल्या अनेक वर्षात वाढला नव्हता. अमित शाहांना मी एमएसपीबाबत लेखी निवेदन पाठवणार आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

हे देखील वाचा : सात राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका; भाजपाचा दारूण पराभव

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....