Saturday, November 23, 2024
Homeराजकीयअजित पवारांच्या आमदाराची राजकीय निवृत्ती जाहीर, वारसदारही ठरला!

अजित पवारांच्या आमदाराची राजकीय निवृत्ती जाहीर, वारसदारही ठरला!

बीड । Beed

आगामी विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections 2024) पडघम राज्यात वाजू लागले आहेत. अजून विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी देखील प्रत्येक पक्षानं उमेदवारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच आता अजित पवार गटातून (Ajit Pawar Group) एक मोठी बातमी समोर येत आहे.

- Advertisement -

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजलगावचे (Majalgaon) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केलं असून आपल्या राजकीय वारसदाराचीही त्यांनी घोषणा केली आहे.

आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे. सध्या प्रकाश सोळंके हे 2024 च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गावांचे दौरे करत आहेत. त्याचवेळी एका गावात बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

जयसिंह सोळंके हे प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे चिरंजीव आहेत. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता जयसिंह सोळंके हेच प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या