Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या...त्या नंतर ह्या मुलांनी काय करायचे? ; कंत्राटी भरतीवरुन शरद पवारांची राज्य...

…त्या नंतर ह्या मुलांनी काय करायचे? ; कंत्राटी भरतीवरुन शरद पवारांची राज्य सरकारवर टीका

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar Press Conference) यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात पाच महिन्यात १९ हजार मुले आणि मुली बेपत्ता झाले असून महिला बेपत्ता होण्याचेही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. यासोबतच, शासकीय भरती कंत्राटीपद्धतीने करण्याचा सरकारने निर्णय घेतलाय, पोलीस दलातही कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला असून कंत्राटी भरतीवरून शरद पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील कायदा- सुव्यवस्थेवरुन राज्यसरकार निशाणा साधला. “राज्यात पाच महिन्यात १९,५५३ महिला बेपत्ता असल्याची आकडेवारी बाहेर आली असून ती धक्कादायक आहे. या प्रकरणी गृहमंत्रालयाने योग्य तपास करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

”तेव्हा उध्दव ठाकरेंची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती”…; अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

पोलीस भरतीत ११ महिने कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या नंतर ह्या मुलांनी काय करायचे असा प्रश्न या मुलांसमोर आहे. दत्तक घेतलेल्या शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला आहे. सरकारने शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जात आहेत, अशी टीका पवारांनी केली.

कंत्राटी भरती एवढ्या मोठ्या काळात याआधी कधी झाली नव्हती. होमगार्ड, संरक्षण दला सारखे विभाग अधिक सक्षम केले तर सरकारला कंत्राटी पोलीस भरती करण्याची गरज भासणार नाही असे शरद पवार यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले, आर.आर पाटील गृहमंत्री असताना त्यांनी पारदर्शकपणे भरती प्रक्रिया केली होती. तशी भरती कायमस्वरुपी करावी.

शरद पवारांचं टेन्शन वाढणार? अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन हस्तक्षेप याचिका दाखल

६ सप्टेंबर २०२३ रोजी शासनाने निर्णय जाहीर केला, त्यात बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्यासाठी काही ठिकाणी कंत्राटीरितीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल तरुणांसोबत समाजामध्ये तीव्र भावना आहे असे ही त्यांनी सांगितले.

यावेळी पवारांनी अजित पवारांवर देखील निशाणा साधला, माझे एक सहकारी होते ते म्हणायचे की शरद पवार हे पंतप्रधान व्हायला हवे, मी म्हणायचो माझ्याकडे १० खासदार आहेत. मी कसा पंतप्रधान होणार. आपल्याकडे किती लोक आहेत यावर ठरते. असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या