Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : पहाटेच्या शपथविधीवरुन छगन भुजबळांचा थेट शरद पवारांना सवाल; म्हणाले,...

NCP Crisis : पहाटेच्या शपथविधीवरुन छगन भुजबळांचा थेट शरद पवारांना सवाल; म्हणाले, “गुगली टाकून आपल्याच गड्याला…”

मुंबई | Mumbai

राज्याच्या राजकारणत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी मुंबईत नेते कार्यकर्त्यांच्या बैठका बोलवल्या आहेत.

- Advertisement -

अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा दिल्याने पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरु आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आपण टाकलेल्या गुगलीवर फडणवीस बाद झाले असा टोला लगावला होता. पण आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावरुन शरद पवारांनाच सवाल केला आहे. २०१९ मध्ये सकाळचा शपथविधी का झाला? त्यामागे कोण होतं? साहेब म्हणतात की मी गुगली टाकली, पण गुगली टाकून आपल्याच गड्याला बाद करायचं का?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

NCP Crisis : कोणता पक्ष, कोणता विचार अन् कसली निष्ठा.. इथं पसरलीय बरबटलेल्या…; बैठकीपुर्वी रोहित पवारांचे ट्विट

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. मात्र, जसजसे भाषणं होतील तसतसे बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. आज ४० पेक्षा अधिक आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. काही वाहतूक कोंडीत अडकले, काही परदेशात अडकले, तर कुणी आजारी आहे. या सगळ्यांनी प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच, लोक सातत्याने विचारतात की, तुमच्यावर कारवाई होईल. शरद पवारांनंतर मीही शिवसेना पक्ष निर्माण झाला तेव्हापासून ५७-५८ वर्षे काम करतो आहे. मंचावर बसलेले नेतेही ज्येष्ठ आहेत. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम कसं करू? कायदे आम्हालाही कळतात. त्यामुळे जे लोक सांगतात की, ही कारवाई होईल, ती कारवाई होईल त्यांनी लक्षात घ्यावं की या सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही पुढचं पाऊल टाकलं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

NCP Crisis : “मी अजितदादांना रविवारी भेटले होते, पण…”; ‘त्या’ भेटीवर सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

- Advertisment -

ताज्या बातम्या