Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याNcp Crisis : आम्ही भांडत बसलो अन् भाजपा मजा बघतंय; रोहित पवारांचा...

Ncp Crisis : आम्ही भांडत बसलो अन् भाजपा मजा बघतंय; रोहित पवारांचा घणाघात

मुंबई | Mumbai

अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे मागील काही दिवसांपासून राजकीय वाचावरण चांगलच तापलं आहे. एकमेकांवर दावे प्रतिदावे केले जात आहे. त्यातच आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि अजित पवारांनी केलेल्या बंडावर मोठं वक्तव्य केलं आहे. यासोबतच अजित पवारांसोबत गेलेल्या बंडखोर नेत्यांनाही अनेक खोचक सवाल केले.

- Advertisement -

VIDEO : “…पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही”; प्रसार लाड यांनी अरविंद सावंतांना दिली थेट ‘वॉर्निंग’

रोहित पवार म्हणाले की, आज देशभरात भाजपविरोधात वातावरण तयार होत आहे. त्याबद्दल कुणी काही बोलू नये, मोठे नेते आपापसात गुंतवून राहावेत, यासाठी भाजपने आधी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. आम्ही आमच्यातच उत्तर-प्रत्युत्तर देत आहोत आणि तिकडे भाजप बाजुला राहत आहे. पक्ष फोडण्याचे खापर अजितदादांवर फोडले जात आहे. अजित दादांना विलेन ठरवण्याचे काम चार-पाच नेते करत आहेत. तिकडे भाजप एसीत बसून मजा पाहत आहे आणि आम्ही आमच्यातच भांडतोय, अशी टीका त्यांनी यावेळी केली. अजित पवारांसोबत गेलेले प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वतःला बाजूला करत आहेत. निर्णय घेताना हा विकासासाठी निर्णय घेतला असं सांगतात मग पदं असताना तुम्ही विकास केला नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे ही लढाई भूमिका, अस्मिता, स्वाभिमान आणि एका विचाराची आहे असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

भाजपसोबत गेलेले आज म्हणत आहे की, आम्ही विकासासाठी हा निर्णय घेतला. मग तुम्ही पदावर असताना विकास केला नाही का, असा प्रश्न सामान्यांना पडतोय. या सगळ्या घडामोडी होत होत्या, तेव्हा माझ्या आई-वडीलांनी मला प्रश्न केला की, तू वयस्कर होशी, 80च्या पुढे जाशील, तेव्हा अशीच भूमिका घेणार का? माझ्याच आई-वडिलांना हा प्रश्न पडत असेल, तर सामान्यांना पडणारच ना. मी माझ्या पक्षासोबत, माझ्या आजोबांसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. या सर्व घडामोडींना राज्यातील जनता व्यक्तिगत घेत आहे, त्यामुळे जनता आमच्या सोबत कायम असेल. कुटुंब कुणी फोडले, पक्ष कुणी फोडला, हे सगळ्यांना माहिती आहे. सत्तेसाठी भाजपने राज्यातील दोन मोठे कुटुंब फोडले, हे लोकांना पटले नाही. एकेकाळी भाजपविरोधात बोलणारे सत्तेसाठी त्यांच्यासोबत बसले आहेत, हे लोकांना पटणारे नाही. हे लोक पवार साहेबांसोबत असे करू शकतात, तर सामान्यांचे काय, असा सवाल प्रत्येकाला पडला आहे, अशी टीकाही रोहित पवारांनी यावेळी केली.

Crime News : शेतकऱ्याने केले नको ते धाडस, पोलीस पोहचले थेट शेताच्या बांधावर अन्….

शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवारांचे वय ३७ वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन ४० वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचे वयही लहान आहे. रोहित पवारांमुळे शरद पवार यांची साथ सोडली. कामे होत नव्हती म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असा आरोप दिलीप वळसे-पाटील यांनी केला होता. त्याला आज पत्रकार परिषद घेत रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले. दिपीळ वळसे-पाटील यांच्या वयाचा मान ठेवून त्यांना मी उत्तर देणार नाही. पण, मी वळसे-पाटील यांना प्रत्यक्ष उत्तर देईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. रोहित पवार म्हणाले, विकासकामांसाठी आम्ही शरद पवारांची साथ सोडली असे आता सांगत आहेत. मात्र, यापूर्वी त्यांच्याकडे अनेक वर्षे पदे होती. एवढी वर्षे सत्तेत असूनही त्यांनी विकास केला नाही का? असा प्रश्न त्यांच्या दाव्याने निर्माण होत आहे.

“आपल्या देशातील नेते अशिक्षित, ज्यांच्याकडे…”; अभिनेत्री काजोलचं विधान चर्चेत

- Advertisment -

ताज्या बातम्या