Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : घरी बसून आशीर्वाद द्या म्हणता, तुमच्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या;...

NCP Crisis : घरी बसून आशीर्वाद द्या म्हणता, तुमच्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या; सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची आज पहिलीच जाहीर सभा होतीये. या सभेत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर यांनी घणाघाती भाषणं केल्यानंतर अजित पवार यांनीही डॅशिंग अंदाजात भाषण केलं. यावेळी बोलताना अजितदादांनी अनेक विषयांवर परखडपणे भाष्य करत पवारांचे वय आता 83 झाले असून, आता तरी तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? आशीर्वाद देणार की नाही? असं म्हणत शरद पवार यांच्यावर टीका केली. याला सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

NCP Crisis : पहाटेच्या शपथविधीवरुन छगन भुजबळांचा थेट शरद पवारांना सवाल; म्हणाले, “गुगली टाकून आपल्याच गड्याला…”

‘काही लोकांचं वय झालंय त्यामुळे त्यांनी आशिर्वाद द्यावेत, असं काही जण म्हणाले. का बरं आशिर्वाद द्यावेत. रतन टाटाचं वय काय, सीरम इन्स्टिट्यूट पुनावाला त्यांचं वय काय 84 घेतलं का नाही इंजक्शन. अमिताभ बच्चन वय काय 82. फारुक अब्दुल्ला साहेबांपेक्षा तीन वर्ष मोठा आहे. आपल्या वडिलांना म्हणायचं घरी बसा आणि आशिर्वाद द्या, त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका मांडली आहे.

२०१९ मी विसरले नाही, ते विसरले असतील. २०१९ मध्ये ११ सीट राष्ट्रवादीला मिळाल्या, कुणालाही वाटेल कुणी केलं असेल पण सर्वे मी पाहिलाय. हाच ८० वर्षांचा योद्धा लढला. जेव्हा जेव्हा या देशाचा इतिहास लिहीला जाईल, तो फोटो या देशाच्या राजकारणाच्या इतिहासात असेल आणि परवाचाही असेल. शपथविधी झाल्यानंतरही लोक म्हणत होते आता काय होणार, राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला, त्यावर एकच उत्तर आलं शरद पवार. पण गंमत अशी आहे की त्या बॅनवर पण शरद पवारच आहेत. पण तुमचं नशीब तुम्हाला लखलाभ, जे गेले त्याना शुभेच्छा. पण आता लढाई आता सुरु झाली आहे. ना खाऊंगा ना खाने दुंगा बोलणाऱ्या भाजपविरोधात आता लढाई सुरु झाली आहे. कैसे तुमने खाया आज के बाद तुमको महाराष्ट्र मे खाने नही दुंगी… असा थेट इशारा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपला दिला आहे. इतकेच नव्हे तर आठ नऊ खुर्च्या मोकळ्या झाल्या आहेत त्यावर नवीन लोकांना संधी मिळेल. आता राष्ट्रवादीचा एकच शिक्का आणि त्याचं नाव – शरद पवार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

- Advertisment -

ताज्या बातम्या