Wednesday, February 4, 2026
Homeनगरराष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याने मागितली दरमहा 2 लाख खंडणी

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याने मागितली दरमहा 2 लाख खंडणी

पवनचक्की प्रकल्पाच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण || पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील दरोडी येथील पवनचक्की प्रकल्पाच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण करत दरमहा 2 लाखांची खंडणी मागितल्याची घटना दि.18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी सिक्युरिटी गार्ड राजेंद्र दौलत घुले (रा.कारेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष विकास राघु पवार (रा.राळेगण थेरपाळ) याच्यासह अनोळखी 7-8 जणांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले दरोडी शिवारातील कंपनीच्या कार्यालयात असताना विकास पवार तेथे आला. पवार याने गचांडी पकडून खुर्चीवरून खाली ओढत घुले यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या हातातील कोयता थेट गळयाजवळ रोखून तू येथे कसे काम करतोस? असे धमकावले. पवार हा मारहाण करत असताना त्याच्या पाठोपाठ 7 ते 8 जण काठया घेवून क आले. त्यांनी कार्यालयाच्या खिडकी, संगणक आणि ऑपरेटिंग सिस्टम व मोबाईलची तोडफोड केली.

YouTube video player

व परत येथे कामाला आल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तुझ्या मालकाला सांग पवनचक्की चालवायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रूपये मला द्यावे लागतील. पवारने घुले याच्या खिशातील 22 हजार रूपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. भांडणाचा आवाज ऐकून साईड इन्चार्ज किरण पवार हे घटनास्थळी आले आणि त्यांनी मारहाण थांबवली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...