Tuesday, May 7, 2024
Homeधुळेराष्ट्रवादी म्हणजे व्हिजन नसलेला पक्ष - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रवादी म्हणजे व्हिजन नसलेला पक्ष – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

धुळे – प्रतिनिधी dhule

राष्ट्रवादी कॉग्रेस (ncp) मध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू आहे. त्यांच्या अंतर्गत नाराजी आहे. मुळात पक्षाला कोणतेही व्हिजन नाही. नेत्याने तयार केलेली ही कुडी असून नेता गेला की राष्ट्रवादी गेली, असे विधान भाजपचे (bjp) नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी केले.

- Advertisement -

या नाराजीतून कोणी भाजपात आले तर त्यांचे स्वागतच आहे, असेही ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आज धुळे जिल्हा दौऱ्यावर असून संघटनात्मक संवादाकरिता त्यांचा हा दौरा आहे.

संघटनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आठ वर्षाच्या सरकारमधील कार्यकाळात केलेल्या गरीब कल्याण योजना तसेच महाराष्ट्रात आलेल्या नवीन सरकारकडून वाढलेल्या अपेक्षा, जबाबदारीची जाणीव कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे व संघटनेच्या माध्यमातून केंद्रीय राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणे यातून संघटनात्मक शक्ती मजबूत झाली पाहिजे यासाठी हा दौरा आहे.

यावेळी त्यांनी मागील सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या बजेटवर मागील सरकार मोठी तरतूद करायचे परंतु हा निधी जाणीवपूर्वक न वापरता बजेट वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात हा न वापरलेला निधी इतर विभागाकडे वर्ग केला.

यामुळेच आदिवासी समाजाच्या विकासाचा अनुशेष असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना आदिवासी विकास विभागाचा निधी हा केवळ आदिवासी विकास विभागाकरताच वापरला गेला असल्याचा दावाही त्यांनी केला.

महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त आपले मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी याकूब मेमन यांच्या कबर सौंदर्यीकरण या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील बावनकुळे यांनी केला. प्रत्येक संवेदनशील घटनेची माहिती गृह विभागाला दिली जात असते, मग एवढ्या मोठ्या प्रकरणाची माहिती गृह मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना मिळाली नव्हती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पंकजा मुंडे नाराज नाही

पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर बोलताना बावनकुळे यांनी पंकजा मुंडे भाजपवर नाराज नसल्याचे सांगितले. पंकजा मुंडे यांनी कुठेही अशा पद्धतीचे स्टेटमेंट केलं नसून त्या पूर्णपणे भाजपाचेच ते काम करत आहेत असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीला व्हिजन नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफुस असून ती वेळोवेळी समोर देखील येत असल्याचं स्पष्ट केले आहे. तसेच या नाराजी नाट्यानंतर जर कोणी भाजपमध्ये येऊ इच्छुक असेल तर भाजप स्वागत नक्कीच करेल. राष्ट्रवादी पक्ष हा कुठलाही व्हिजन नसलेला पक्ष आहे.

राष्ट्रवादी पक्ष म्हणजे नेत्यांनी तयार केलेली कुडी असून नेता गेला की राष्ट्रवादी गेली, असं म्हणत बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. नाशिक येथील आदिवासी बाळ विक्री प्रकरणावर बोलताना बावनकुळे ते म्हणाले.

या प्रकरणाची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही याची पूर्णतः काळजी यापुढे शिंदे व फडणवीस सरकार घेणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांच्यासह माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या