Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसंभाजीराजेंबद्दल केलेल्या त्या वक्तव्यावरुन वातावरण तापले; जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला

संभाजीराजेंबद्दल केलेल्या त्या वक्तव्यावरुन वातावरण तापले; जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या चालत्या गाडीवर भर रसत्त्यात हल्ला झाला आहे. तीन अज्ञात इसमांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवरुन हा हल्ला करण्यात आला असल्याचे म्हंटले जात आहे. पत्रकार परिषद आटपून जितेंद्र आव्हाड ठाण्याच्या दिशेने जात असताना हा हल्ला करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. हल्लोखोर कोण होते याचा शोध पोलीस घेत आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या संघटनेकडून विशाळगाडवर आंदोलनही करण्यात आले होते. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आज ठाण्याच्या दिशेला जात असताना तीन जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

- Advertisement -

या हल्ल्यानंतर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत स्वराज्य संघटनेचा एक कार्यकर्ता आपण या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचं म्हणताना दिसतोय. “या महाराष्ट्रभरात गेल्या २५ वर्षांपासून मला कोणी हात लावू शकत नाही, धमकावू शकत नाही, माझ्यापर्यंत कोणी येऊ शकत नाही या आर्विभावात मुस्लीम मतांच्या लालसेपोटी, मुंब्र्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी आमचे मार्गदर्शक, पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले होते. दम होता तर त्या ठिकाणी थांबायचे होते. महापुरुषांविषयी बोलू नको, महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत करु नकोस. सबुरीने राहा अन्यथा येणाऱ्या कालावधी महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल,” असे ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड
“संभाजीराजेंना छत्रपती हे म्हणणे सोडून द्या. कारण त्यांना जो अधिकार होता, त्यांची जी वंशपरंपरा होती, ज्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते त्या रक्तात काय होते आणि यांच्याकडे काय? हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातील माणूस असे वक्तव्य करतो ज्यामुळे दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही”, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या