Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजहल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले, आजपर्यंत मी आहो-जावो करत होतो, पण…

हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले, आजपर्यंत मी आहो-जावो करत होतो, पण…

ठाणे | Thane
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कारवर आज ठाण्यात हल्ला करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हल्ल्यानंतरही संभाजी राजेंसंदर्भात केलेल्या विधानावर माफी मागण्यास नकार दिला. जीव गेला तरी संभाजी राजेंची माफी मागणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्यावर सडकून टीका केली.

जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे जे रक्त होते ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारे होते. भांडणे लावणारे रक्त नव्हते असा त्याचा अर्थ होता. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा १ टक्काही या संभाजींराजेंकडे नाही. जातीजातीत, धर्माधर्मात भांडण लावणारे शाहू महाराजांचे वंशज कसे होतील? ज्यांनी दगड मारलाय त्यांना माझी कारवाई व्यवस्थित समजावून सांगेन असे सांगत आव्हाडांनी सूचक इशारा दिला.

- Advertisement -

“मी तर पुढे बसलो होतो. मला फक्त आवाज आला की, गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. पुढे जाऊन थांबलो. तोपर्यंत हे उलटे फिरले. तीन पोरं होती. माझ्या पोलिसांकडे ४ रिव्हॉल्वहर होते, २४ गोळ्या होत्या. चार पोलीस होते. या असल्या भ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षतावर काही फरक पडणार नाही. मी मुसलमानांसाठी लढत नसतो तर मी विषयावर लढत होतो. गजापूरमध्ये तुम्ही मशिद तोडलीत. पण तिथे फक्त मुसलमान राहत नाहीत. तर तिथे हिंदू देखील राहतात. तिथे ८० टक्के हिंदू राहतात. तिथे सगळे सण एकोप्याने साजरे केले जातात. ही कोल्हापूरची परंपरा आहे. कोल्हापूरमधील एका मस्जिदीच्या बाहेर दारावर गणपतीची मूर्ती आहे. ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली. ही सामाजिक एकता या घराण्याने जपायला पाहिजे होती”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

गाडीवर दगड मारला म्हणून मी विरोधात बोलणार नाही, असे त्यांना वाटत असेल. पण मी आता अजून त्वेषाने आणि तिव्रतेने बोलणार आहे. आजपर्यंत मी आहो-जावो करत होतो. तुम्ही विचाराने चुकलात. तुम्ही शाहू महराजांचे विचार सोडलेत, आम्ही सोडले नाहीत . तुम्ही रक्ताचे वारसदार आहात, आम्ही वैचारिक वारसदार आहे. स्वत:च्या वडिलांनी तुम्हाला बेदखल करून टाकले. वडिलांनी तुमचा निषेध केला, अशी परखड टीका जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या