Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPraful Patel: राष्ट्रीय नेता निवडीपासून ते पक्षाचे विलिनीकरण, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं

Praful Patel: राष्ट्रीय नेता निवडीपासून ते पक्षाचे विलिनीकरण, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं

मुंबई | Mumbai
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्त्वाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार विराजमान झाल्या आहेत. परंतु राष्ट्रीय अध्यक्षपद अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची कमान नेमकं कोण सांभाळणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवाद पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत मोठे विधान केले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी कोण घेणार, राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार, सरकारमध्ये त्यांची जबाबदारी कोण घेणार? अर्थ मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे जाणार? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक होता. याच प्रश्नांची उत्तरे प्रफुल पटेल यांनी दिली.

- Advertisement -

अजित दादांनानंतर सुनेत्रा पवारच पक्षाच्या नेत्या राहतील
अजित दादांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनाच नेतृत्व देऊ हा सगळ्यांचा आग्रह आहे. सर्वांनी म्हटलं की सुनेत्रा पवार ह्याच आपल्या पक्षाच्या नेत्या राहतील. आज मी आमच्या पक्षाबद्दल बोलणार आहे. कोणत्याही काल्पनिक गोष्टीवर मी बोलणार नाही. माझ्याकडून एवढंच सांगतो की, मी त्यांच्यासोबत पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होतो. माझी भूमिका अजितदादांच्या सुसंगत राहिली. तेव्हाच २०२३ रोजी आम्ही निर्णय केला. आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. सर्व आमदार अजितदादांसोबत राहिले. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी चालली. आमच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

YouTube video player

इतर काल्पनिक पक्षांबद्दल काहीही माहित नाही
विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल म्हणाले, सध्या आमच्यासमोर विलिनीकरणाचा विषय नाही. आज आमच्यापुढे फक्त विधिमंडळ आणि पक्षाच्या नेता निवडीचा निर्णय घेण्याचा विषय आहे. मी माझ्या पक्षाबद्दलच बोलणार. इतर काल्पनिक पक्षांबद्दल काहीही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल काहीही माहित नसल्याचे म्हटले.

Ajit Pawar Death: अजितदादांचे कोणतेही धार्मिक विधी होणार नाही; भाऊ श्रीनावास पवारांची माहिती, कारणही सांगितलं

पटेल म्हणाले की, अजित दादांसोबत मी एवढ्या वर्षांपासून सोबत होतो. पदाच्या हिशोबाने मी त्यांचा सर्वात ज्येष्ठ सहकारी. पक्षात माझी जबाबदारी अजित दादांच्या समानच राहिली. त्यामुळेच आम्ही 2023 मध्ये सोबत निर्णय घेतला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नाव न घेता पटेल म्हणाले की, सगळे लोक म्हणत आहेत की, त्यांची चर्चा झाली. त्यांची जर चर्चा झाली असती तर आम्हाला काही माहित होणार नाही असे तर होऊ शकत नाही.

एकत्रीकरणाची कुठलीही चर्चा झाली नव्हती
शरद पवारांसोबतच्या बैठकीचे अजित पवारांचे व्हिडिओ त्यांच्या मृत्यू नंतर समोर येत आहेत, त्यावर पटेल म्हणाले की, शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यासोबत आमचा वैयक्तिक दुरावा नाही. आम्ही देखील त्यांना उघड भेटतो. मग अजित दादा आणि शरद पवार हे तर कुटुंब होते. ते नेहमी त्यांना भेटत होते. त्यामुळे अशा व्हिडिओमुळे बैठक झाली होती, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. एकत्रीकरणाची कुठलीही चर्चा झाली नव्हती. मला वाटत नाही की, माझ्यासारख्याला बाजूला करुन दादांनी काही निर्णय घेतला असता, असे म्हणत प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

ताज्या बातम्या

राहुल

Loksabha Session: राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत मोठा राडा; सभापतींवर कागदपत्रे फेकली,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiमंगळवारी संसदेच्या कामकाजादरम्यान, सभागृहाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे प्रकरण समोर आले. लोकसभेत झालेल्या गोंधळादरम्यान, काही खासदारांनी सभापतींवर कागदपत्रे फेकली. यावर...