धुळे | Dhule
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज धुळ्यातील शिंदखेडा (Shindkheda) येथे शेतकरी मेळावा (Farmers Meeting) पार पडला. या मेळाव्यातून बोलताना पवारांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्याआधी शरद पवारांचे जेसीबीवरून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. तसेच शरद पवार वेळेवर कार्यक्रमाला उपस्थित झाल्यामुळे आयोजकांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
हे देखील वाचा : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा तीन मजली इमारत कोसळली; नऊ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अलीकडंच्या काळात राज्यकर्त्यांना शेतीशी आस्था नाही. त्यांच्याकडून शेतीसंदर्भात धोरणे राबवले जात नाही. कांद्यासंदर्भातील उदाहरण समोर आहे. मोदी सरकारने (Modi Government) त्या कांद्याच्या (Onion) निर्यातीवर बंदी आणली होती. कांद्याला भाव मिळाला नव्हता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने कांद्याचे पीक घेतले. त्यानंतर निर्यात बंदी करण्यात आली. जे, जे तुम्ही पिकवता त्यावर निर्यात बंदी केली. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. देशात ऊस उत्पादन राज्यात होते. पण ऊसाला किंमत मिळत नाही, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.
तसेच मी दहा वर्ष कृषी विभागाचे (Agriculture Department) काम करत होतो, तेव्हा देश अन्नधान्यासंदर्भात स्वयंपूर्ण झाल्याचे होता. त्यामुळे जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणाऱ्या देशात भारत पहिल्या क्रमांकावर पोहचला. हा बळीराजाचा देश आहे. शिंदखेडा तालुक्यात सत्तेचा गैरवापर सुरु आहे. येथे एक प्रकारची गुंडगिरी सुरु आहे. हेमंत देशमुखांसारखा नेता तुरुंगात टाकण्याचे कामं केले. हा सत्तेचा गैरवापर आहे. सरकार लोकांच्या सेवेसाठी आहे, सत्तेचा माज काहींच्या डोक्यात आला आहे. सत्तेचा उन्माद आहे, त्यांना जागा दाखविण्याचे काम या निवडणुकीत करायचे आहे, असे आवाहन शरद पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.तसेच गेल्या २० वर्षांत या सरकारने ना कारखाने, ना सहकार चळवळीसाठी काम केले ना रोजगार दिला. त्यामुळे काहीच विकास झाला नाही,असेही शरद पवारांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nitin Gadkari : “मला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती”; नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, हे सरकार बहिणींना १५०० रुपये देणार आहे. पण बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज आहे. बहिणींचा सन्मान राखला जावा, त्याकडे सरकारचे लक्ष नाही,असा टोलाही शरद पवारांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारला लगावला. तसेच तुम्ही हे राज्य महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) हातात द्या, महाराष्ट्राचा चेहरा तुम्हाला बदललेला दिसेल, अशी ग्वाही मी देतो, असेही शरद पवार यांनी या मेळाव्यात बोलताना सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा