Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभेचा घोळ विधानसभेत नको! शरद पवारांची निवडणुक आयोगाकडे 'ही' मागणी

लोकसभेचा घोळ विधानसभेत नको! शरद पवारांची निवडणुक आयोगाकडे ‘ही’ मागणी

मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआला चांगले यश मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या पक्षाला नव्या चिन्हामुळे फटका बसला. यावरून शरद पवार गटाच्या नेत्यांनी संभ्रम निर्माण करणाऱ्या चिन्हामुळे उमेदवारांचा पराभव झाल्याचा आरोपही केला.

तुतारी चिन्हाशी साम्य असलेल्या ‘पिपाणी’ चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. पिपाणीला दीड लाख मतं गेली असून साताऱ्याची सीट पडण्यास हे चिन्हंच कारणीभूत ठरल्याचा दावा, जयंत पाटील यांनी केला होता. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसू नयेसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, या पक्षाने आता ‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी निवडणुक आयोगाकडे केली आहे.

- Advertisement -

यात रा. काँग्रेसच्या दोन उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात रावेर मतदारसंघात रक्षा खडसेंविरोधात उभे असलेल्या श्रीराम पाटील तर दुसरे शशिकांत शिंदे यांना पिपाणी या चिन्हामुळे मोठा फटका बसला होता. लोकसभेत निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच चिन्ह होते तुतारी वाजवणारा माणूस तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अपक्षाला ट्रम्पेट म्हणजे पिपाणी हे चिन्ह देण्यात आले होते.

साताऱ्यामध्ये पिपाणीच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना ३७,०६२ मते मिळाली. तर उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यातल्या मतांचा फरक ३२,७७१ इतका आहे. यात ३७ हजार मते पिपाणीला गेली आहे असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

आता आगामी विधानसभा निवडणुकीत हे चिन्ह कोणालाही देऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलेय. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह देण्यात आल्यामुळे अनेक मतदारांमध्ये संभ्रम झाला होता. त्यामुळे, निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत घोळ करू नये अशी मागणी या पत्रात केलीय.

पिपाणी चिन्हांमुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला फटका बसल्यानंतर शरद पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे ही विनंती करण्यात आली असून निवडणूक आयोगाने योग्य निर्णय न घेतल्यास शरद पवार पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या