Wednesday, March 26, 2025
Homeनगरराष्ट्रवादीचा आज नगरमध्ये विजयी मेळावा

राष्ट्रवादीचा आज नगरमध्ये विजयी मेळावा

शरद पवारांसह नवनिर्वाचित खासदार लावणार हजेरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा वर्धापन दिन आज सोमवार (दि.10) रोजी नगरमध्ये होणार आहे. यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीतील यशाचा विजयी मेळावा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली. या मेळाव्यास पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पक्षाचे लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

10 जूनला वर्धापन दिनी नगर शहरात राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्याचा मान नगर राष्ट्रवादीला मिळाला आहे. या वर्धापन दिनी नगरमध्ये मोठा मेळावा घेणार असून लोकसभा निवडणुकीत नगरला मिळालेल्या विजयानंतर नगर शहरात पहिला विजय मेळावा यानिमित्ताने होणार आहे. विजयोत्सव साजरा करणे व आगामी विधानसभा निवडणूक हाच या मेळाव्याचा अजेंडा आहे, असे फाळके यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना 10 जून 1999 रोजी करण्यात आली. दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातो. यंदा रौप्यमहोत्सवाचा मान नगरकरांना मिळाला.

आज सायंकाळी 5 वाजता न्यू आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेज, नगर याठिकाणी हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी पक्षाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, अंकुश काकडे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यासह राज्यातील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात नूतन सर्व खासदारांसमवेत लंके यांचाही सन्मान केला जाणार आहे. या महोत्सवासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्‍यांनी आणि जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन नवनिर्वाचित खा. लंके, आ. प्राजक्त तनपुरे, आ. रोहित पवार, माजी आ. राहुल जगताप, सरचिटणीस प्रताप ढाकणे, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर आदींनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...