Monday, June 17, 2024
Homeनगरनगरच्या 12 मतदारसंघांत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू- खा. लंके

नगरच्या 12 मतदारसंघांत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू- खा. लंके

राष्ट्रवादीचा रौप्य महोत्सव || राज्यभरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची नगरमध्ये मांदियाळी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने पक्षाचा रोैप्य महोत्सव नगरमध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यासह नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी खासदार आणि पराभूत उमेदवारांसह पक्षाचे माजी मंत्री, आमदार, ज्येष्ठ नेते यांच्यासह राज्यभरातील नेते आणि कार्यकर्ते नगरमध्ये हजर होते. यावेळी बीडचे खा. बजरंग सोनवणे यांनी पक्षाच्या खासदारांवर विधानसभेची जबाबदारी सोपवावी, तर नगरचे खा. नीलेश लंके यांनी नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या 12 मतदारसंघांत महाआघाडीचा झेंडा फडकवू, असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रवादी पक्षाचा रौप्य महोत्सव आणि लोकसभा निवडणुकीचा विजय मेळावा नगरमध्ये पारपडला.

शहरातील मध्यभागी असणार्‍या न्यू आर्ट कॉलेजच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी प्रेमी उपस्थित होते. यावेळी मैदानासह व्यासपिठावर राज्यासह नगरमधील नेत्यांची मोठी गर्दी दिसून आली. कार्यक्रमाला सायंकाळी सुरूवात झाल्यानंतर सव्वा सहा वाजता शरद पवार यांचे व्यासपिठावर आगमन झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. नीलेश लंके, खा. अमोल कोल्हे, खा. बजरंग सोनवणे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. अमर काळे, खा. भास्कर भगरे, खा. बाळामामा म्हात्रे, खा. फौजिया खान, माजी मंत्री आ. अनिल देशमुख, आ. राजेश टोपे, आ. प्राजक्त तनपुरे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. रोहित पवार, आ. संदीप क्षीरसागर, आ.शशिकांत शिंदे, अंकुश काकडे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, रावेरचे श्रीराम पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, सुनील भुसारा, शेतकरी नेते जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवरील नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले. अन्य पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादीने 80 टक्के यश मिळवले असल्याचे ते म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत अनुभव सांगितले. यावेळी आ. तनपुरे म्हणाले, कपटी पद्धतीने भाजपने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार घालवले. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. आ. रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांचा केवळ विचार केल्याने प्रेरणा मिळते. पवार ही व्यक्ती नसून विचार आहे. नकली राष्ट्रवादीचा विजयाचा रेट 25 टक्के असून भाजपचा रेट 34 टक्के आहे. यावरून राज्यातील जनतेने भाजप आणि महाविकास आघाडीला नाकारले असल्याचे दिसत आहे. कार्यक्रमात जयंतराव गायकवाड, उत्तम जानकर, खा. काळे, खा. भगरे, खा. सोनवणे, खा. सुळे, पंडितराव कांबळे, मेहबूब शेख यांचे मनोगत झाले.

कार्यक्रमात नाशिक नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदा प्रश्नावर आवाज उठवणारे किरण सावंत यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खा. लंके म्हणाले, लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. आता मुंबईवर झेंडा फडकवण्याची वेळ आली आहे. आज विधानभा निवडणुकीचा नारळ फुटला पाहिजे. नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या बाराही जागा निवडून आणून दाखवतो. मी जे बोलतो ते करूनच दाखवतो, असा विश्वास खा. लंके यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांनी लोकसभेच्या निकालामुळे डोक्यात हवा जावून देवू नका. विधानसभेसाठी तयारी करा,असे आवाहन केले.

पवारांचा नाद करायचा नाही
ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है. पवार साहेबांनी चेंडू टाकला आणि समोरच्यांचा त्रिफळा उडाला. नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांनो, भले भले थकले. आता जनतेच्या प्रश्नावर संसद बंद पाडण्याची वेळ आली आहे. लवकरच दिल्लीला जाऊन सगळं पाहून आणि समजून येतो, असे खा. लंके आपल्या शैलीत म्हणताच खुद्द शरद पवार यांनी देखील खा. लंके यांना मनमुरादपणे हसत दाद दिली.

लंके यांनी केली व्हिडीओ शुटींग
कार्यक्रम सुरू असताना व्यासपिठावर उभे असणारे खा. लंके यांनी व्हिडीओ शुटींग करणार्‍या व्यक्तीकडून कॅमेरा घेत थेट व्यासपिठासह सभेचे शुटींग केले. हे पाहून शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांना खा. लंके यांची ही कृती चांगलीच भावली. लंके यांच्या हातात व्हिडीओ शुटींगचा कॅमेरा पाहून शरद पवार देखील अवाक झाले.

सभेचे काटेकोर नियोजन
कमी कालावधीत नगरच्या विजयी सभेचे काटेकोर नियोजन खा. लंके यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले. सभेच्या बैठक व्यवस्थेसह व्यासपिठ, सत्काराचे आखीवरेखीव नियोजन करण्यात फाळके यशस्वी ठरले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात फाळके यांचा मोलाचा वाटा होता. निकालाच्या दिवशी शेवटपर्यंत निकालाच्या आकडेवारीपर्यंत फाळके यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या