Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAmol Mitkari: अमोल मिटकरींची मराठी कलावंतांना मदतीची साद; म्हणाले,"निदान फुलाच्या पाकळी इतकी...

Amol Mitkari: अमोल मिटकरींची मराठी कलावंतांना मदतीची साद; म्हणाले,”निदान फुलाच्या पाकळी इतकी तरी…”

मुंबई | Mumbai
मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती अक्षरशः खरडून गेली आहे, जनावरे वाहून गेली आहे. शेतकऱ्यांसमोर खुप मोठे संकट उभे राहिले आहे. मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे .अनेकांना स्थलांतर करावे लागले आहे . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबई पुण्यात राहणाऱ्या मराठी कलावंतांना मदतीचे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, सोनू सूद जसा पंजाबच्या मदतीला धावला. तितकी मदत नको पण निदान फुलाच्या पाकळी इतकी तरी मराठवाड्यातील आपल्या बांधवांना मदत करा. याच मराठवाड्याने आपल्याला फाळके पुरस्कारापासून ते महाराष्ट्र भूषण पर्यंत पोहोचविले आहे असे म्हणत मिटकरींनी कलाकारांना भावनिक साद घातली आहे.

- Advertisement -

अमोल मिटकरी काय म्हणाले?
अमोल मिटकरी म्हणाले, सर्व मराठी कलावंत, पुण्या मुंबईत राहणारे सिने अभिनेते, गायक शाहीर यांना विनंती. सोनू सूद जसा पंजाबच्या मदतीला धावला तितकं नाही पण निदान फुलाच्या पाकळी इतकी तरी मराठवाड्यातील आपल्या बांधवांना मदत करा. याच मराठवाड्याने आपल्याला फाळके ते महाराष्ट्र भूषण पर्यंत पोहोचविले आहे. असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या