Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDhananjay Munde: ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…धनंजय मुंडेंच्या...

Dhananjay Munde: ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…धनंजय मुंडेंच्या जीममधील Videoची चर्चा

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असलेल्या धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर जीममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये ते जीममध्ये व्यायाम करताना दिसत असून, आपल्या फिटनेसवर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे या व्हिडीओतून दिसून येते. मात्र, व्हिडीओपेक्षा त्यासोबत लिहिलेल्या कवितेच्या ओळींनी अधिक लक्ष वेधून घेतले आहे.

- Advertisement -

Nashik News: जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी उबाठाकडून प्रभारी शिवसेना पदाधिकारी जाहीर

‘घायाळ मन… अजूनही धैर्य टिकवून आहे’

धनंजय मुंडे यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे,


‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…
भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे…
निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे…
हरवण्याची आता बिशाद कुणाची… स्वतःशी सुद्धा लढतो आहे…’

बऱ्याच काळानंतर सक्रीय झालेल्या मुंडे यांनी ही पोस्ट टाकून आपण सर्व आरोप, टीका आणि अडचणींनंतरही खचलेलो नाही, लढत राहणार असल्याचा संदेश दिला आहे. “निंदा-दूषणे आता न भिडती” या ओळीतून त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिल्याचे मानले जात आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सिंहस्थाच्या तोंडावर झारखंड गँग नाशिकमध्ये; चोरी, दरोड्याचा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) शहरात सुरू केलेल्या हाय-अलर्ट व विशेष गस्त मोहिमेमुळे एक आंतरराज्यीय गुन्हेगारांटी टोळी...