Monday, September 7, 2026
HomeनाशिकNashik News: जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी उबाठाकडून प्रभारी शिवसेना पदाधिकारी जाहीर

Nashik News: जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी उबाठाकडून प्रभारी शिवसेना पदाधिकारी जाहीर

नाशिक । प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी प्रभारी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली.

नाशिक जिल्हा सचिवपदी नीलेश साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा संघटक म्हणून किर्ती जवखेडकर यांच्याकडे इगतपुरी, सिन्नर आणि देवळाली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ऋषी वर्मा यांच्याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- Advertisement -

संपादकीय : ७ सप्टेंबर २०२६ – उच्चस्तरीय समितीची कठीण ‘परीक्षा’

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा प्रमुख म्हणून कारभारी पंडित आहेर यांची नियुक्ती झाली आहे. नाशिक शहर महानगर संघटक म्हणून विष्णू पवार आणि संजय परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सुनील जाधव यांची उप जिल्हाप्रमुख (कार्यालयीन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी, बागलाण, कळवण, चांदवड, येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

ताज्या बातम्या

MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; पुण्यात मोर्चा, रोहित पवारांचा सरकारवर...

0
पुणे । Pune महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात आज पुण्यातील रस्त्यांवर तरुणाईचा प्रचंड असंतोष उफाळून आला. लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि MPSC...