Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे…; रोहित पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, म्हणाले, सुरवातीला टाळ्या-थाळ्या…

Rohit Pawar: मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे…; रोहित पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, म्हणाले, सुरवातीला टाळ्या-थाळ्या…

मुंबई | Mumbai
पुढील काही दिवसांत मेलोडी चॉकलेटच्या पॅकेटप्रमाणे प्रति लिटर ५० रुपये वाढ झाली तरी आश्चर्य वाटणार नाही. शिवाय ५० रुपये वाढ झाली म्हणून तुम्हाला कुणी १ लिटर पेट्रोल-डिझेल गिफ्टही देणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी पंतप्रधानांनचे अच्छे दिनच्या वक्तव्यापासून ते सध्याच्या देशाच्या राजकारणात केंद्रस्थान असलेल्या झुरळ आणि मेलोडी या दोन्ही मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

- Advertisement -

पेट्रोल-डिझेल किमतीत १० दिवसांत तिसऱ्यांदा वाढ; नाशिकसह इतर शहरातील काय आहे नवे दर?

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
“देशात पेट्रोल-डिझेलचे दर मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे दर तीन-चार दिवसांनी लिटरमागे १-१ रुपयांनी वाढत असून आज त्यात पुन्हा वाढ झाली. पुढील काही दिवसांत मेलोडी चॉकलेटच्या पॅकेटप्रमाणे प्रति लिटर ५० रुपये वाढ झाली तरी आश्चर्य वाटणार नाही. शिवाय ५० रुपये वाढ झाली म्हणून तुम्हाला कुणी १ लिटर पेट्रोल-डिझेल गिफ्टही देणार नाही आणि पंपावर तासनतास रांगेत उभं राहूनही पेट्रोल-डिझेल मिळेलच याचीही खात्री नाही”, असे रोहित पवार म्हणाले.

याशिवाय, “सुरवातीला टाळ्या-थाळ्या वाजवण्याचा प्रयोग झाल्यानंतर आता परदेशात फिरु नका, पेट्रोल-डिझेल वाचवा, सोनं खरेदी करु नका, तेल खाऊ नका असं लोकांना सांगणारं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं सरकार अशी ‘दैदिप्यमान’ कामगिरी या सरकारने केलीय. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सत्तेत आलेल्या या सरकारने देशभरातील झुरळांची अशा प्रकारे जिरवण्याचं काम सुरु केलंय, पण त्रस्त झुरळं आता संघटीत होत असून सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे”, असेही रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...