Thursday, June 11, 2026
HomeनाशिकPetrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल किमतीत १० दिवसांत तिसऱ्यांदा वाढ; नाशिकसह इतर शहरातील...

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल किमतीत १० दिवसांत तिसऱ्यांदा वाढ; नाशिकसह इतर शहरातील काय आहे नवे दर?

नाशिक | प्रतिनिधी
आखाती देशात सुरु असलेल्या संघर्षाची झळ भारतात पोहोचली असून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पेट्रोल लिटरमागे ८७ पैशांनी महाग होऊन १०९.७४ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेल लिटरमागे ९४ पैशांनी महाग होऊन ९६.३० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला आणखी झळ पोहोचणार आहे.

गेल्या अवघ्या १० दिवसांच्या आत झालेली ही तिसरी मोठी दरवाढ आहे. या नव्या वाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आता थेट शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या घडामोडींमुळे तेल कंपन्यांवर असलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही दरवाढ सलगपणे लागू केली जात जात आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर चार रुपयांपेक्षा जास्त महागले आहे. यासोबत सीएनजीच्या दरातही वाढ होण्याची संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

संपादकीय : २३ मे २०२६ – इंधनाचे ‘अच्छे दिन’ अन् होरपळणारे लोक

यापूर्वी गेल्या आठवड्यात १५ मे रोजी ३ रुपयांनी दरवाढ केली होती तर १९ मे रोजी ९० पैशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा ही वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाचा उल्लेख करत, लोकांना पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर लगेच इंधन दरवाढीचे सत्र सुरु झाले आहे.

शहरातील पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ
पेट्रोल डिझेल
नाशिक १०९.७४ ९६.३०
मुंबई १०८.४५ ९५.०२
कोल्हापूर १०९.३० ९५.८९
भंडारा १०९.६० ९६.१८
सोलापूर १०९.१४ ९५.७४
अमरावती १०९.१५ ९५.६८

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...