Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्यारोहित पवारांच्या अडचणी वाढणार?; 'या' प्रकरणी होणार चौकशी

रोहित पवारांच्या अडचणी वाढणार?; ‘या’ प्रकरणी होणार चौकशी

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तांतर झाल्यापासून राज्यातील विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांच्या पाठीमागे ईडीचा (ED) ससेमिरा लागला आहे.

- Advertisement -

त्यामुळे विरोधीपक्षातील नेते केंद्रातील व राज्यातील भाजप (BJP) सरकारवर टीका करतांना दिसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांच्या मागेही ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार हे २००६ ते २०१२ या कालावधीत ग्रीन एकर कंपनीचे (Green Acre Company) संचालक होते. पवार संचालक असलेल्या या कंपनीची सध्या ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे.

रोहित पवार यांच्यासह राकेश वाधवान (Rakesh Wadwan) हे देखील कंपनीच्या संचालकपदी होते. ते सध्या एका बँकेतील घोटाळ्याप्रकरणी आरोपी आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी ईडीला तक्रार मिळाली होती. त्यामध्ये रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठविण्यात आली, तसेच देशात आली, याची चौकशी व्हावी, अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती.या तक्रारीवर ईडीकडून चौकशी करण्यात येत असून प्राथमिक तपास सुरू झाला आहे.

तसेच रोहित पवार यांचे वाधवान यांच्याशी संबंध आहेत, का हेही तपासले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची माहिती कंपनीने लपवून ठेवल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या