Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार की अजित पवार? आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर केली भूमिका,...

शरद पवार की अजित पवार? आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर केली भूमिका, म्हणाल्या…

नाशिक | Nashik

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर दोन्ही गटांकडून दावा सांगितला जात आहे. असं असलं तरी काही आमदार तटस्थ भूमिकेत होते. यापैकीच एक म्हणजे नाशिकमधील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अखेर कुणाला पाठिंबा देणार याबाबत भूमिका स्पष्ट केली. सरोज अहिरे यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांच्या स्वागताला उपस्थित रहात त्यांना पाठिंबा जाहीर केला.

- Advertisement -

भुजबळांना सिद्धगड, मुश्रीफांना विशाळगड तर मुंडेंना प्रचितगड; NCP च्या ९ मंत्र्यांना मिळालेल्या बंगल्यांची यादी

आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, आज अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे मी त्यांच स्वागत करण्यासाठी आले आहे. मी आता मतदारसंघात सगळ्यांशी चर्चा केली आहे.  माझा निर्णय जवळपास झाला आहे. शरद पवार वडिलांसारखे आहेत, तर अजित पवार भावासारखे आहेत. अजितदादांनी भावासारखं प्रेम दिलं, असंही अहिरे म्हणाल्या. तसेच, माझी द्विधा मनस्थिती होती. माझी ९० टक्के लोकांशी चर्चा केली आहे. देवळाली मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सत्तेत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मी अजित पवार यांना पाठिंबा देणार आहे, असंही सरोज अहिरे म्हणाल्या.

Accident News : भीषण अपघात! भरधाव पिकअपची पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या