Friday, April 25, 2025
Homeराजकीयस्वतंत्र पक्ष म्हणून लढा, शरद पवारांचे फोटो-व्हिडीओ…; अजित पवार गटाला कोर्टाचे निर्देश

स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, शरद पवारांचे फोटो-व्हिडीओ…; अजित पवार गटाला कोर्टाचे निर्देश

मुंबई । Mumbai

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नेत्यांमध्ये राजकारण रंगले असून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्यात राजकीय वातावरण तापले असतानाच दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा. इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढा. तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ यांचा फोटो वापरु नका याच्या सूचना द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले आहेत. त्याशिवाय आम्ही दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. सगळ्या ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा मजकूर लिहा, असेही कोर्टाने अजित पवार गटाला सांगितले.

महत्त्वाचं म्हणजे, कोर्टाकडून अजित पवार आणि शरद पवार गटाला निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. शरद पवार यांचे फोटो अजित पवार गटाकडून वापरले जात असल्याची तक्रार शरद पवार गटाने कोर्टात केली होती. आज त्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी बोलताना कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. व्हिडीओ वगैरेचा कधी कधी प्रभाव पडतो… दरवेळी मतदारांना प्रभावित करेल असं नाही. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही, असेही कोर्टाने निरीक्षण नोंदवलं.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...