Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNCP Politics: ठरलं तर! दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र निवडणुक लढणार; 'या' तारखेला...

NCP Politics: ठरलं तर! दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र निवडणुक लढणार; ‘या’ तारखेला युतीची घोषणा होण्याची शक्यता

पुणे | Pune
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यासाठी दोन्ही पक्षांकडून हालचालींना वेग आला असून महत्वाच्या नेत्यांच्या पुण्यात बैठका सुरू आहेत. सोमवारी (२२ डिसेंबर) मुंबईत चर्चा झाली आणि दोन्ही बाजूंनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी आज (२३ डिसेंबर) माध्यमांना दिली. त्याचवेळी शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जोरदार हालचाली सुरु असून येत्या २५ किंवा २६ तारखेला घोषणा होण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. अजित पवार यांचा तीन दिवस पुण्यात मुक्काम आहे. चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. पुणे महापालिकेतील एकूण 165 जागांपैकी कोण, किती जागांवर लढणार यावर आता चर्चा सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांच्या पक्षाकडून एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची लवकरच घोषणा
या बाबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार असून लवकरच याची घोषणा केली जाईल. ते म्हणाले की, ‘पुण्यामध्ये रात्री दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याबाबत ठरवले आहे. जागा वाटपासाठी दोन- दोन पावले आम्ही मागे घेणार होतो. प्रशांत जगताप कालच्या बैठकीला नव्हते. विशाल तांबे, वंदना चव्हाण यांच्यासोबत बैठक होणार आहे. २५ किंवा २६ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होईल.’

YouTube video player

कोणत्या चिन्हावर निवडणुक लढवणार?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत आणि दोन्ही पक्ष त्यांच्या चिन्हांवर निवडणूक लढवू शकतात, असे सुभाष जगताप यांनी स्पष्ट केले आहे. काही प्रभागांबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा त्यांनी केली. यावरून दोन्ही राष्ट्रवादी यांच्यातील चर्चा अंतिम फेरीत आल्याचे संकेत आहेत. कारण ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

प्रशांत जगतापांचा राजीनामा
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईल असे त्यांनी सांगितले होते. आता नाराज असलेले प्रशांत जगताप हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. ते सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : शौर्याचा तिरंगा नभात फडकला; ‘भारत माता की जय’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गंगापूर धरण परिसरातील (Gangapur Dam Area) आकाशात शुक्रवारी (दि. २३) दुपारी भारतीय वायुदलाच्या 'सूर्यकिरण' एरोबॅटिक टीमने सादर केलेल्या चित्तथरारक हवाई...