Sunday, August 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi:पंतप्रधानांनी स्वतः याचे आदेश द्यावेत, नाही तर...; मल्लिकार्जून खरर्गेंच्या भाषणानंतर शुद्धिकरणाच्या...

Rahul Gandhi:पंतप्रधानांनी स्वतः याचे आदेश द्यावेत, नाही तर…; मल्लिकार्जून खरर्गेंच्या भाषणानंतर शुद्धिकरणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचा इशारा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. या मुद्द्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधितांवर एससी-एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास काँग्रेसकडून त्याहून मोठी प्रतिक्रिया दिली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

शुद्धीकरण अस्पृश्यतेचे दुसरे नाव
राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि संविधानासाठी दिले आहे, ते हलद्वानी येथे भाषण द्यायला गेले होते आणि त्यांच्या सभेनंतर तिथे ‘शुद्धीकरण’ केले गेले. 8 ऑगस्टला खरगेजींची रॅली होते आणि 10 ऑगस्टला भाजप-आरएसएसचे कार्यकर्ते तिथे जाऊन शुद्धीकरण करतात. हा संविधानानुसार एक गुन्हा आहे. शुद्धीकरण अस्पृश्यतेचे दुसरे नाव आहे. संविधानाने अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवली असतानाही हे लोक जाहीरपणे त्याचे आचरण करत आहेत. ‘शुद्धीकरण’ करून ते संदेश देत आहेत की दलित घाणेरडे आहेत, त्यांना स्पर्श करू नये. हा संविधानानुसार गंभीर गुन्हा आहे.

नेपाळला पुन्हा महापुराचा इशारा! ‘लेंडे नदीवरील तलाव फुटू शकतो’, चीनने दिला गंभीर इशारा

पंतप्रधानांनी स्वतः याचे आदेश द्यावेत
पुढे राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान म्हणतात की ते प्रत्येक जातीचे आहेत आणि संपूर्ण भारताचे पंतप्रधान आहेत. पण त्यांच्याच पक्षाचे उत्तराखंडचे नेते उघडपणे म्हणतात की शुद्धीकरण करण्यात काहीच गैर नाही. ‘शुद्धीकरण करणे हा गुन्हा आहे’ आणि यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आमची मागणी आहे की ज्यांनी उत्तराखंडमध्ये हे शुद्धीकरण केले आहे, त्यांच्यावर एससी/एसटी कायद्यांतर्गत तत्काळ एफआयआर (FIR) नोंदवला जावा आणि पंतप्रधानांनी स्वतः याचे आदेश द्यावेत. ही घटना भाजप आणि आरएसएसची मानसिकता दर्शवते. त्यांना या देशातील दलितांची प्रगती नको आहे, दलितांनी सन्मानाने आणि यशस्वीपणे जगावे असे त्यांना वाटत नाही.

राहुल गांधींनी वाचून दाखवली अत्याचाराची मालिका
राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमातून दलितांवर होणाऱ्या अत्याचाराची मालिका सांगितली. यावेळी राहुल गांधी यांनी पुरावे देखील दिले. राहुल गांधी म्हणाले, ‘ देशात मनुस्मृती आणि संविधान या दोन विचारांमध्ये लढाई सुरू आहे. संविधानानंतर मनूस्मृतीचं पालन करण्याची बाब बेकायदेशीर आहे. शाळेत दलित विद्यार्थ्यांकडून टॉयलेट स्वच्छ केले जात आहेत. साफसफाई करून घेतली जाते. लहान मुले पाहत आहेत. शाळेत काही जणच झाडू मारताना दिसतात. हे वास्तव आहे. दलितांना विहिरीवर पाणी पिऊ दिलं जात नाही. चहाच्या दुकानातही भेदभाव पाहायला मिळतो. चहाच्या दुकानावर दोन प्रकारचे कप असतात. एक कप पुन्हा वापरला जाऊ शकतो. तो काचेचा कप असतो. तर दुसरा पेपर कप असतो. हा कप फेकला जातो. पेपर कप हा दलितांसाठी वापरला जातो. तर काचेचा कप दुसऱ्या लोकांसाठी वापरला जातो’.

‘वरातीत आनंदाच्या दिवशी नवरदेव घोड्यावर चढल्यानंतर हेल्मेट घालतो. दगडफेक केली जाते. हे भारताचं वास्तव आहे. हे उत्तर प्रदेश, उत्तर भारताचं वास्तव आहे. या गोष्टी गावात आणि शहरातही पाहायला मिळतात. दलित व्यक्ती यशस्वी झाल्यानंतरही त्याच्यावर अत्याचार केला जातो. दररोज लाखो लोकांवर होतो. परंतु दलित पुढे गेल्यानंतरही त्याच्यावर अत्याचार होतो. अलवरमध्ये एका दलित नेत्याने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाजप नेत्याने शुद्धिकरण केले होते. ज्ञानदेव आहूजा असे भाजप नेत्याचे नाव, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच परभणीत ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा...

0
परभणी । Parbhani शेतकरी, युवक आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांमुळे चर्चेत असलेल्या परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात रविवारी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री...