मुंबई | Mumbai
मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. ४ नोव्हेंबर) रोजी पत्रकार परिषद घेत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपण एकाही जागेवर उमेदवार उभा करणार नाहीत. सोबत घेतलेल्या पक्ष, घटकांनी आतापर्यंत आपल्या उमेदवारांची यादी न दिल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. पण मराठा समाजाने ज्याला पाडायचे आहे, त्याला पाडावे, असेही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्याचा फायदा भाजपाला झाला असता
मनोज जरांगे आणि आघाडीचा काहीही संबंध नाही. हा निर्णय त्यांचा आहे. मला आनंद आहे, त्यांनी हा निर्णय घेतला. भाजपला आमचा विरोध आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी उमेदवार ठेवले असते तर त्याचा फायदा भाजपला झाला असता. या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य आहे, असे शरद पवारांनी म्हटले.
शरद पवार पुढे म्हणाले, याचा महाविकास आघाडीशी कोणताही काही संबंध नाही. हा निर्णय मनोज जरांगेंचा आहे. पूर्वीचा निर्णयही (निवडणूक लढवण्याचा) त्यांचा होता. मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचे एकच कारण आहे. ते सतत सांगत आहेत भाजपाला आमचा विरोध आहे. ते भाजपाविरोधात खेळले असते तर त्याचा फायदा भाजपालाच झाला असता. त्यादृष्टीने त्यांचा निर्णय योग्य आहे.”
निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य
“निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे. ज्या व्यक्तीचा कालखंड संपलेला आहे, त्याबद्दल जाहीरपणे अनेक लोक बोलतात. सत्तेच्या गैरवापराबद्दल, त्यांना एक्स्टेंशन देऊन त्यांच्या कालखंडात निर्णय घेण्याचा प्रयत्न होता. त्यावर निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला. आता त्या कोणत्याही पदावर असू नये”, असे शरद पवार म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा