Friday, February 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअजित दादांच्या विमानात बॉम्ब होता का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराकडून शंका उपस्थित

अजित दादांच्या विमानात बॉम्ब होता का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराकडून शंका उपस्थित

बीड | Beed
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आता 10 दिवस होत आले आहेत. 28 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी बारामती येथे व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ‘लियरजेट-45 एक्सआर’ या विमानाला अपघात झाला आणि या अपघातात अजित पवारांसह विमानातील ४ जणांचा मृत्यू झाला.. या घटनेनंतर याबाबतचे नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू आहे. याबाबत चौकशी अहवाल देखील समोर येत आहेत. दरम्यान, आता अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे.

याप्रकरणी आता एअरक्राफ्ट ‘ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांच्या पथकाकडून अपघाताची चौकशी सुरू आहे. मात्र त्यानंतरही विरोधकांकडून वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात येत आहेत. शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विमानात बॉम्ब होता का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisement -

अजित दादांच्या विमानात बॉम्ब होता का? सवाल उपस्थित
अजित दादांच्या विमानात बॉम्ब होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय दादांचे विमान जमीनीला टेकण्याआधीच विमानात स्फोट झाला, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

YouTube video player

देवगिरी बंगला ते विमानतळ सगळे व्हिडिओ फुटेज तपासले पाहिजे
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर भाष्य करताना बजरंग सोनवणे म्हणाले की, “या अपघात संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. याचा पूर्ण तपास झाला पाहिजे. या अपघातात संशय घ्यायला जागा आहे. देवगिरी बंगला ते विमानतळ सगळे व्हिडिओ फुटेज तपासले पाहिजे. जमिनीला विमान टेकायच्या अगोदर स्फोट झाला. त्याच्यात बॉम्ब होता का? इंधनाचा स्फोट झाला की विमानांत बिघाड झाला होता? याचे सगळे डिटेल्स पुढे आले पाहिजेत, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली.

CM Devendra Fadnavis: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरुन राजकारण करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं

महत्त्वाचे म्हणजे विमानात ६ लोक होते, मग ५ मृतदेहच का सापडले? तसेच ज्या प्रकारे अपघात झाला ते पाहता, त्या विमानात बॉम्ब होता का? हेही पाहिले पाहिजे. अंजली दमानिया यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. विमानाचा पायलट कोण होता? याचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले गेले पाहिजे. विमान वरच क्रॅश झाले किंवा विमान हवेतच ब्लास्ट का झाले? असे प्रश्नही बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केले.

अजित दादा राजकारणातले माझे पालक
सोनवणे म्हणाले, राजकारणात माझे पालक अजित दादा होते. त्यांच्या आठवणी जपण्यासाठी येडेश्वरी साखर कारखाना परिसरात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाचं जे स्वप्न अजित दादांनी पाहिलं होतं, ते आता सुनेत्राताई पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar Mayor : अहिल्यानगर महानगरपालिकेत महापौर ज्योती गाडे आणि उपमहापौर धनंजय...

0
अहिल्यानगर । Ahilyanagar अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्याने निवडून आलेल्या महापौर ज्योतीताई अमोल गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी आज आपल्या पदाचा औपचारिक पदभार स्वीकारला. या प्रसंगी...