Saturday, September 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNCP: "पक्षातील नेत्यांना बदनाम करण्यासाठी…"; सुरज चव्हाणांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप, म्हणाले,...

NCP: “पक्षातील नेत्यांना बदनाम करण्यासाठी…”; सुरज चव्हाणांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप, म्हणाले, जशास तसे…

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. यावेळी, राष्ट्रवादीच्या संविधानात एकूण 7 फ्रंटल सेल पैकी 3 फ्रंटल सेल काढल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल हे तीनही सेल काढल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी रोहित पवारांचे आरोप खोडत त्यांच्यावर टीकाही केली आहे.

मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर प्रचंड आगपाखड केली. रोहित पवार यांच्या टीमकडून गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच्यापुढे जर बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल. आमच्या पक्षात कोणी चुकत असेल तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार सुनेत्रा वहिनींना आहे. सध्या जे काही राजकारण केले जात आहे ते योग्य नाही, अशी टीका सुरज चव्हाण यांनी केल

- Advertisement -

एजन्सीला ५ कोटींचे पॅकेज
सुरज चव्हाण पुढे म्हणाले, “रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडावी आणि पक्षातील नेत्यांना बदनाम करण्यासाठी तब्बल 5 कोटींचे पॅकेज एका एजन्सीला दिलेले आहे. तसेच, पक्षातील पदाधिकाऱ्यांना पगार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोटे आरोप करण्यासाठी नेमणुका केल्या आहेत. त्यांचे पदाधिकारी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे काम करत आहेत. राष्ट्रवादीमध्ये कशी फुट पडेल, कशी भांडणे लागतील यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू अश्विनी भिडे BMC च्या आयुक्तपदी; पहिल्यांदाच आयुक्तपद महिलेकडे

त्यांच्याच एका प्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन अशी बातमी सोडली की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानातून काही फ्रंटल वगळण्यात आले. त्यामध्ये ओबीसी, सामाजिक आणि इतर सेलचा समावेश असेल. प्रसारमाध्यमांना अर्धवट माहिती देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसची जी घटना आहे, त्यामध्ये पक्ष स्थापन झाल्यापासून फ्रंटलचे पाच विभाग आहे आणि सेल आपल्याला वाढवता येतात. फ्रंटलमध्ये एक येते फादर बॉडी, महिला काँग्रेस, युवकची बॉडी, विद्यार्थी आणि सेवादल हे फ्रंटलचे भाग आहेत. हाच कागद दाखवून महाराष्ट्राची दिशाभूल करण्यात आली. त्यांनी असे सांगितले, सेवादल, अल्पसंख्याक, ओबीसी सेल, सामाजिक न्याय हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आले. हे सगळे घटक फ्रंटल सेलचा भाग कधीच नव्हते, असे सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

default-featured-image

Raj Thackeray : एसआयआर विरोधात ‘या’ तारखेला मुंबईत जनमोर्चा; मनसे-ठाकरे सेनेचा...

0
मुंबई | Mumbai देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' (एसआयआर) संदर्भातील काही निर्णय त्यांचे इतर दोन सहकारी सुखबीर सिंग...