सिन्नर | वार्ताहर Sinnar
सिन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे समर्थक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठल उगले हे विजयी झाले. त्यांनी खासदार राजाभाऊ वाजे उबाठा गटाचे प्रमोद चोथवे यांचा तब्बल ५,६०२ मतांच्या फरकाने पराभव केला. नगरसेवक पदावर राष्ट्रवादीच्या १३ तर शिवसेना उबाठा गटाच्या १४ नगरसेवकांनी बाजी मारली. भाजपला दोन तर शिवसेना शिंदे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
नगरसेवक पदासाठी प्रभाग निहाय असा रंगला सामना
प्रभाग १ अ मधून शिवसेना उबाठाच्या सविता सुनिल खोळंबे (१०९६) यांचा अवघ्या एक मताने विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादीच्या वंदना केशव गोजरे (१०९५), भाजपाच्या मिनल विलास सहाणे (२६१) व शिंदे गटाच्या पूजा गणेश खर्जे (३३३) यांचा पराभव केला.
प्रभाग १ ब मध्ये राष्ट्रवादीचे बाळू पांडुरंग उगले (१६१७) यांनी उबाठाचे संतोष वसंत शिंदे (७८३), शिंदे गटाचे गणेश हरिभाऊ खर्जे (२६२), भाजपाचे गणेश भाऊशेठ लोंढे (१३४) यांचा पराभव केला.
प्रभाग क्र. २ अ मध्ये उबाठाच्या सविता खंडेराव कानडी (११७४) यांनी राष्ट्रवादीच्या शितल सुनील कानडी (११०४) यांचा विजयी रथ रोखला
प्रभाग २ ब मध्ये राष्ट्रवादीचे पंकज गणपत जाधव (१०४३) यांनी उबाठाचे राजेंद्र पुंजाजी घोरपडे (७७१), भाजपाचे चंद्रकांत पोपट गवळी (४२१) यांना पराभवाची धुळ चारली.
प्रभाग ३ अ मध्ये राष्ट्रवादीच्या कांताबाई बाळू जाधव (१०३१) यांनी शिवसेना उबाठाच्या शोभा श्रीकांत जाधव (९००) व भाजपाच्या मनिषा सुधाकर भालेराव (२०६) यांचा पराभव केला.
प्रभाग ३ ब मध्ये राष्ट्रवादीचे आशिष तथा शेखर पोपट गोळेसर (१२१०) यांनी उबाठाचे नितिन रावसाहेब कराळे (६१७), भाजपाचे गणेश सुकदेव परदेशी (२६१) व कम्युनिष्ट पक्षाचे हरीभाऊ तांबे (५१) यांचा पराभव केला.
प्रभाग ४ अ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शोभा राजेंद्र जाधव (९९०) यांनी राष्ट्रवादीच्या संध्या अशोक जाधव (७९०) व उबाठाच्या आशा माणिक जाधव (२८०) यांचा पराभव केला.
प्रभाग ४ ब मध्ये राष्ट्रवादीचे सागर मुरलीधर भाटजीरे (१०७९) यांनी शिंदे गटाचे शुभम रामनाथ लोंढे (७९७), भाजपाचे हर्षल मिलिंद गोळेसर (१३४), अपक्ष देवानंद हरिभाऊ जाधव (२५३), उबाठाचे संदिप भास्कर लोंढे (५२) यांना पराभूत केले. प्रभाग क्र ५ अ मध्ये याआधीच उबाठाचे उदय गोळेसर बिनविरोध निवडून आलेले आहेत.
प्रभाग ५ ब मध्ये राष्ट्रवादीच्या मनिषा योगानंद गवळी (१३५०) यांनी काँग्रसेच्या तहरीन साजिद खतिब (११५९), भाजपाच्या असुदिप वैभव भाटजिरे (३२१), शिंदे गटाच्या अर्जना संदिप नळवाडे (३६४) यांचा पराभव केला.
प्रभाग क्र. ६ मध्ये उबाठा गटाच्या लक्ष्मी राजू पवार (९७८) यांनी राष्ट्रवादीच्या दिपाली संतोष बेंडकुळे (९७८), भाजपाच्या विद्या दिपक मोरे (४९७) यांचा पराभव केला.
प्रभाग ६ ब मध्ये उबाठाचे मनोज प्रतापराव देशमुख (८०३) यांनी राष्ट्रवादीचे प्रशांत सुनिल सोनवणे (४४६), अपक्ष मेहमुद इब्राहिम दारुवाले (६६३), भाजपाच्या सविता अरुण कोठूरकर (३२४), शिंदे गटाचे संदिप कमलाकर कोथळे (२१९), अपक्ष सागर घनश्याम देशमुख (५१) यांचा पराभव केला.
प्रभाग ७ अ मध्ये उबाठाचे सागर राजेंद्र कोथमिरे (१००७) यांनी राष्ट्रवादीचे अजय शंकर तुपे (५५०), भाजपाचे अॅड. नितिन फकिरचंद परदेशी (५०५), शिंदे गटाचे शंकर देविदास दोडके (१७५) यांना पराभवाची धुळ चारली.
प्रभाग ७ ब मध्ये उबाठाच्या अंबिका लोकेश धनगर (९५०) यांनी राष्ट्रवादीच्या शांताबाई मल्लू पाबळे (५००), भाजपाच्या शोभा विनोद शितोळे (५३४), शिंदे गटाच्या वनिता सुनिल पाबळे (२०७), अपक्ष उमेदवार रोहिणी मदन जाधव (४७) यांचा पराभव केला.
प्रभाग ८ अ मध्ये उबाठाच्या संध्या श्याम कासार (१४३५) यांनी भाजपाच्या प्रियंका अतुल बोर्हाडे (७७७), राष्ट्रवादीच्या जयश्री सुरज भगत (८७०) यांचा पराभव केला.
प्रभाग ८ ब मध्ये राष्ट्रवादीचे हर्षद प्रभाकर देशमुख (२१४९) यांनी उबाठाचे प्रशांत रामराव रायते (६४२), भाजपाचे शुभम दिलीप येलमामे (२९७) यांचा पराभव केला.
प्रभाग ९ ब मध्ये ललिता दत्तात्रय हांडे (१४२४) यांनी उबाठाच्या वनिता विष्णू गोजरे (६२८), भाजपाच्या श्रद्धा सतिष भडांगे (१८७), शिंदे गटाच्या पूजा सागर लोंढे (११६) यांचा पराभव केला.
प्रभाग ९ ब मध्ये राष्ट्रवादीचे अजय सतिश गोजरे (१७१८) यांनी उबाठाचे संतोष माधवराव तुंगार (५३८), शिंदे गटाचे पवन अशोक जाधव (८९) यांचा पराभव केला.
प्रभाग १० अ मध्ये भाजपाच्या आशा काशिनाथ कर्पे (११६१) यांनी उबाठाच्या शुभांगी संदिप गुळे (१११५), राष्ट्रवादीच्या मंदाकिनी अनिल कर्पे (३८१) यांचा पराभव केला. १० ब मध्ये भाजपाचे अनिल अशोक सरवार (१७२८) यांनी उबाठाचे सोमनाथ पंढरीनाथ पावसे (११६६), अपक्ष अक्षय अशोक चकोर (२३) यांना धुळ चारली.
प्रभाग ११ अ मध्ये कमळबाई भास्कर पगार (११२५) यांनी राष्ट्रवादीच्या वैशाली अनिल वराडे (९४२) व भाजपाच्या लता विजय सातारकर (३७७) यांचा पराभव केला.
प्रभाग ११ ब मध्ये उबाठाचे शुभम भास्कर वारुंगसे (१०७४) यांनी राष्ट्रवादीचे किरण राजाराम गोजरे (९१४), भाजपाचे अनिल निवृत्ती नागरे (४५०) यांचा पराभव केला.
प्रभाग १२ अ मध्ये राष्ट्रवादीचे सुदर्शन प्रभाकर नाईक (१४४३) यांनी उबाठाचे सागर निवृत्ती मुत्रक (८२६), भाजपाचे अमोल रामभाऊ खैरनार (३७०) यांचा पराभव केला.
प्रभाग १२ ब मध्ये उबाठाच्या निशा संजय बोडके (११७६) यांनी राष्ट्रवादीच्या कोमल रविंद्र मोगल (९८८), भाजपाच्या कल्पना अवधूत आव्हाड (४५८) यांचा पराभव केला.
प्रभाग १३ अ मध्ये उबाठाचे अमोल अशोक झगडे (११३२) यांनी राष्ट्रवादीचे विजय एकनाथ झगडे (५८७), भाजपाचे निलेश माणिक लोणारे (४४४), शिंदे गटाचे किरण नामदेव लोणारे (२०७), अपक्ष शरद हिरामण लोणारे (३५) यांचा पराभव केला.
१३ ब मध्ये राष्ट्रवादीच्या योगिता हरिभाऊ वरंदळ (८७८) यांनी भाजपाच्या अनुराधा कन्हैया वरंदळ (७११), उबाठाच्या संगिता रामदास लोणारे (५५२), शिंदे गटाच्या योगिता कैलास झगडे (२४२) यांचा पराभव केला.
प्रभाग १४ अ मध्ये उबाठाचे पंकज अशोक मोरे ( १७४१) यांनी राष्ट्रवादीचे सचिन साहेबराव देशमुख (१६०), भाजपाचे वेदांत मधुकर काळे (१६५) यांचा पराभव केला.
प्रभाग १४ ब मध्ये उबाठाच्या ज्योती पंकज मोरे (१५३४) यांनी राष्ट्रवादीच्या शितल नितीन विसे (५३१) यांचा पराभव केला.
प्रभाग क्र. १५ अ मध्ये राष्ट्रवादीचे विलास गोपीनाथ जाधव (६४५) यांनी उबाठाचे रुपेश रखमा मुठे (४८१), शिंदे गटाचे ऋषिकेश नरेंद्र नाईक (११५), भाजपाचे आकाश शरद बर्डे (१९१) यांचा पराभव केला तर
प्रभाग क्र. १५ ब मध्ये राष्ट्रवादीच्या सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे (८५६) यांनी उबाठाचे प्राजक्ता राजेश दराडे (३५०), भाजपाच्या मनिषा तुकाराम रेवगडे (२२६) यांचा पराभव केला.





