Friday, May 24, 2024
Homeनाशिकजिल्हा बँकेला अर्थसहाय्य करा ; माजी खासदार पिंगळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार...

जिल्हा बँकेला अर्थसहाय्य करा ; माजी खासदार पिंगळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक टंचाईत असून याबाबत माजी खासदार तथा नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी बुधवारी (दि.१२) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत जिल्हा बँक पुनर्जीवित करण्यासाठी दोन हजार कोटीं रुपये कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करावे,अशी आग्रही पिंगळे यांनी केली आहे.ही मागणी मान्याय होईल,अशी अपेक्षा असल्याने नाशिकरांच्या विशेषता जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

- Advertisement -

जिल्हा बँकेला ६८ वर्षांची परंपरा असून ही बँक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बँकांमध्ये गणली जात होती. जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणात जिह्यातील सहकारी संस्थाची मातृसंस्था म्हणून बँकेने कामकाज केले आहे असून प्राथमिक, विविध कार्यकारी, दुग्ध संस्था, खरेदी विक्री संघ, नागरी बँका नागरी पतसंस्था, सहकारी साखर कारखाने अश्या अनेक सहकारी संस्था उभारणीत मोलाचा वाटा आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सभासद-शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शेती व शेतीपूरक कामासाठी या बँकेने अर्थसहाय्य देऊन मोठे योगदान दिले आहे. आज मितीला जिल्हा बँकेची कर्ज वसुली अभावी एनपीए वाढल्याचा अहवाल ‘नाबार्ड’ने सन २०१६ मध्येच दिला आहे. ३० फेब्रुवारी २०१७ रोजी रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेवर बरखास्तीची कारवाई वेळ आली होती.

आरबीआयच्या निर्देशानुसार सहकार विभागाने कलम ११० अन्वये बरखास्तीचे आदेश काढल्यास नाशिक सहकारात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसान सामोरे जावे लागू शकते. नाशिक जिल्ह्याची अर्थवाहिनी समजली जाणारी बँक वाचविण्यासाठी माजी खासदार तथा नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांनी बुधवारी (दि .१२) रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची आजची परिस्थिती सांगत दोन हजार कोटी रुपयांचे शासनाकडून कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य देण्याची मागणी पर निवेदन दिले.त्यांच्या समवेत माजी आमदार शिवराम झोले,बाजार समितीचे माजी संचालक दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे आदी उपस्थित होते.

ना.भुजबळांकडूनही सहकार्याची अपेक्षा

नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थितीबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही सविस्तर चर्चा केली होती. यात भुजबळ यांनी देखील जिल्हा मध्यवर्ती बँक वाचविण्यासाठी पाठपुरावा करणार असून शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे,असे सांगितले आहे. एकंदरीतच या प्रश्न भुजबळांचे सहकार्य मिळाल्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रश्न मार्गी लागणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या